Friday, October 16, 2026
Homeनागपूरअन् ड्रायव्हरच निघाला चोर…-८ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त

अन् ड्रायव्हरच निघाला चोर…-८ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- घराला कुलूप लावून वास्तू समारंभासाठी गेलेल्या व्यक्तीच्या घराचे कुलूप तोडून रोख ३.५० लाख रुपये चोरी करणाऱ्या आरोपीला वाडी पोलिसांनी ३६ सीसीटीव्हींचे फुटेज तपासून दोन दिवसांत गजाआड केले आहे.

रोहित मोरेश्वर डहाके २९, रा. फुटाळा जुनी वस्ती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी ऋषभसेन राजेशकुमार संघानी (४२, रा. रॉयल ऑर्चिड अपार्टमेंट, वाडी) हे आपल्या घराला कुलूप लावून कुटुंबासह ड्रायव्हरसोबत नातेवाइकांच्या वास्तू समारंभासाठी गेले होते.अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील आलमारीतील ३.५० लाख रुपये चोरी केले.याप्रकरणी संघानी यांनी वाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.वाडी पोलिसांनी दोन दिवस परिसर पिंजून काढला.तसेच, अमरावती मार्गावरील ३२ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. संघानी यांच्या ओळखीचे,काम करणाऱ्या व कार्यालयातील व्यक्तींवर पाळत ठेवली.पोलिसांना आरोपी रोहितवर संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी रोहित हा यांच्याकडे मागील ८ वर्षांपासून ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता.आरोपी रोहितकडून रोख २ लाख ४३ हजार ५०० रुपये, घराची चावी व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ८.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई झोन १ चे पोलिस उपायुक्त अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश तटकरे,उपनिरीक्षक कुणाल धुरट, हवालदार प्रमोद गिरी, हेमराज बेराल, सतीश येसणकर,प्रवीण फलके,प्रमोद सोनवणे यांनी केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!