- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासांतच जवळपास २० संस्थांच्या ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सदरचा निर्णय हा वादग्रस्त ठरला असून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती देत प्रकरणाची चौकशी करण्याचे फर्मान सोडले आहे.विशेष म्हणजे,राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला असतांनाच हे कारस्थान करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकाळात अल्पसंख्यांक दर्जा देण्याच्या फाईल्सना स्थगिती देण्यात आली होती.नंतर हे खाते अजित पवारांकडे गेले.प्रकरण प्रलंबित असतांनाच अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूच्या दिवशीच काही तासांच्या आतच ही प्रमाणपत्रे देण्यात आली.अजित पवारांच्या निधनाच्या दिवशीच तब्बल सहा शाळांना हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.अजित पवारांच्या निधनाचा शोक संपूर्ण राज्यात निर्माण झाला होता.हे खातेही त्यांच्याकडे होते.नेमक्या त्याच दिवशी हे प्रमाणपत्र देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करून या प्रकरणातील अधिकारी किती तत्पर व निष्ठावंत असल्याचे दिसून येत आहे.सदरची बाब उघडकीस आल्यानंतर राज्य अल्पसंख्याक आयोगानेही नाराजी व्यक्त केली आहे.आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन तात्काळ कारवाई करावी,अशी मागणीही केली आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी देखील या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाई करावी,अशी मागणी केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यांनी या प्रकरणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
- Advertisement -

