Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त२९ नक्षल्यांना कंठस्नान; मोठा शस्त्रसाठा जप्त

२९ नक्षल्यांना कंठस्नान; मोठा शस्त्रसाठा जप्त

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये काल, मंगळवारी मोठी चकमक झाली.या चकमकीत २९ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले असून अनेक नक्षली जखमी झाले आहेत.या चकमकीत तीन जवानही जखमी झाले.  बस्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले की,जिल्ह्यातील छोटाबेठिया पोलिस स्टेशन हद्दीतील बिनागुंडा आणि कोरोनार गावांदरम्यान हपतोला गावाच्या जंगलात ही चकमक झाली.चकमकीत मारले गेलेले शंकर राव आणि ललिता हे डीव्हीसी दर्जाचे नक्षलवादी नेते होते. या दोघांवर २५-२५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.माओवाद्यांच्या उत्तर बस्तर विभागातील शंकर,ललिता,राजू आणि इतर नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीनंतर बीएसएफ आणि डीआरजीचे संयुक्त पथक छोटाबेठिया पोलिस स्टेशन परिसरात गस्तीसाठी पाठवण्यात आले.हे पथक हापटोला गावाच्या जंगलात असताना नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला.यानंतर सुरक्षा दलांनीही त्यांना तडाखेबंद प्रत्युत्तर दिले.

कांकेर जिल्हा कांकेर लोकसभा मतदारसंघात येतो जेथे २६ एप्रिल रोजी सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.अशा परिस्थितीत त्याआधी ही धडाकेबाज मोहीम झाल्याने सुरक्षा दलांचे कौतुक करण्यात येत आहे.नक्षल्यांकडून ७ एके ४७ रायफल,१ इन्सास रायफल आणि एसएलआर रायफल, उएलएमजी आणि ३०३ बंदुकांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरू होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!