- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगडच्या काही भागात नक्षलवाद्यांनी उपद्रव माजवून आपले वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला. अशातच नक्षल विरोधी अभियानात अनेक मोठ-मोठी नक्षली ठार झालीत तर काहींनी स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.त्यामुळे नक्षलवाद चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर असतांनाच चार दिवसांपूर्वी गेली २३ वर्षे ट्रक ड्रायव्हर बनून पोलिसांना गुंगारा देणारा झारखंडमधील नक्षली नेता दिलीप महतो वय ४७ वर्षे याला यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे.स्वतःची ओळख छपवून यवतमाळमधील एका स्टोन क्रशर कंपनीत तो ट्रकचालक म्हणून कामाला होता.पोलिसांना त्याचा सुगावा लागताच पोलिसांनी दीड महिना त्याच्यावर पाळत ठेवली आणि चार दिवसांपूर्वी तो उमरी येथील एका स्टोन प्रेशर परिसरात आल्याची माहिती मिळताच त्याला अटक केली.त्याच्या अटकेमुळे अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषदेत कारवाईची माहिती दिली.दिलीप याने खोटे आधार कार्ड आणि वाहनचालक परवाना बनवला होता.गेली २३ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा नक्षली नेता दिलीप महतो हाती लागल्यामुळे नक्षलवाद्यांच्या अनेक कारवायांमागील गुप्त घडामोडी उघड होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.दिलीप याने खोटे आधार कार्ड आणि वाहनचालक परवाना बनवला होता.
मृत व्यक्तीच्या आधार कार्डवर स्वतःचे छायाचित्र👇
दिलीप हा नक्षली कारवायांत सक्रिय असतांना आर्थिक अपहारामुळे अडचणीत आला.त्यामुळे आपल्याच लोकांकडून ठार मारले जाऊ,या भीतीने तो काही महिने मुंबईत राहिला आणि त्यानंतर तो यवतमाळमध्ये राहू लागला,असे म्हटले जात आहे. यवतमाळमधील लकडगंज परिसरात मृत व्यक्तीच्या आधार कार्डवर स्वतःचे छायाचित्र लावून त्याने ओळखपत्र तयार केले.याच पद्धतीने त्याने ट्रकचा परवाना मिळवला.प्रकरणी पोलीस प्रशासन सर्व माहितीची शहानिशा करीत आहेत.
हिंसक कारवायांमध्ये सहभाग👇
दिलीप हा १९९३ मध्ये झारखंडमधील नक्षली गटात भरती झाला.१९९७ मध्ये ‘भितीया दलम’चा विभागीय कमांडर म्हणून त्याची नियुक्ती झाली.सुरक्षा दलावर हल्ले,खंडणी,सरकारी मालमत्तेची नासधूस अशा अनेक हिंसक कारवायांमध्ये त्याचा सहभाग आहे. झारखंडमध्ये त्याच्याविरोधात ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
- Advertisement -

