Thursday, June 4, 2026
Homeगडचिरोली२०२४-२५ करीता जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

२०२४-२५ करीता जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत ‘जिल्हा युवा पुरस्कार’ सन २०२४-२५ साठी अर्ज मागविण्यात येत असून गडचिरोली जिल्ह्यातील युवक,युवती व नोंदणीकृत संस्थांनी समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.राज्याच्या युवा धोरण २०१२ व शासन निर्णय दिनांक १२ नोव्हेंबर २०१३ अन्वये दरवर्षी एक युवक,एक युवती आणि एक संस्था यांना हा पुरस्कार दिला जातो.
इच्छुक पात्र अर्जदारांनी संबंधित कागदपत्रांसह व आवश्यक हमीपत्रांसह बंद लिफाफ्यात दोन प्रतीत प्रस्ताव १ जुलै २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा संकुल,गडचिरोली येथे सादर करावा. अर्जदारांनी कार्यालयीन वेळेत संपर्क साधून सविस्तर माहिती मिळवावी तसेच संबंधित शासन निर्णयाचा अवलोकन करावा,असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
युवक व युवतींसाठी पात्रतेचे निकष👇
वय १ एप्रिल रोजी १३ वर्षे पूर्ण व ३१ मार्च रोजी ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक.अर्जदाराचा जिल्ह्यात सलग ५ वर्षांचा वास्तव्याचा दाखला आवश्यक. मरणोत्तर पुरस्कार दिला जाणार नाही.सरकारी किंवा निमशासकीय कर्मचाऱ्यांना पात्रता नाही.पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक.कार्य स्वयंस्फुर्तीने केलेले असावे व पुरस्कारानंतर दोन वर्षे कार्यरत राहण्याचे हमीपत्र आवश्यक.
संस्थांसाठी पात्रतेचे निकष👇
सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्ट १९५० अंतर्गत नोंदणी आवश्यक. किमान पाच वर्ष कार्यरत असणे अनिवार्य., कार्य स्वयंस्फूर्तीने व समाजहितासाठी असावे.सर्व सदस्यांचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
मूल्यांकनासाठी विचारात घेतले जाणारे निकष👇
दिनांक- १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत केलेले कार्य.ग्रामीण व शहरी भागातील समाजोपयोगी कार्य.आरोग्य,शिक्षण,पर्यावरण, महिला सक्षमीकरण,क्रीडा,विज्ञान,रोजगार,व्यसनमुक्ती आदी विषयांवरील काम.राष्ट्रीय एकात्मता व स्थानिक समस्या निवारणास हातभार लावणारे कार्य.
समाजासाठी सकारात्मक कार्य करणाऱ्या युवक, युवती व संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!