उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत.अश्यातच राज्यातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात येणार आहे.त्यातच,कार्यकाळ संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका किमान सहा महिने तरी होणार नाहीत.त्यामुळे जानेवारी २०२६ पासून डिसेंबर २०२६ पर्यंतच्या काळात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने नुकतेच काढले आहे.यावर १४ ऑगस्ट २०२० च्या शासन आदेशानुसार प्रशासकाची नियुक्ती होणार आहे.तसे आदेश ग्रामविकास विभागाचे अप्पर सचिवांनी काढले असून जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करण्यात आले आहेत.त्यानुसार,राज्यातील तब्बल १४ हजार २३७ ग्रामपंचायतींवर प्रशासक राज येणार आहे.यात नागपूर विभागातील १ हजार ५०८ ग्रामपंचायती,पुणे विभागात २ हजार ८७० ग्रामपंचायती,अमरावती विभागात २ हजार ४५१ ग्रामपंचायती,नाशिक विभागात २ हजार ४७६ ग्रामपंचायती,छत्रपती संभाजीनगर विभागात ४ हजार १३४ ग्रामपंचायती तर कोकण विभागातील ७९८ असे एकूण १४ हजार २३७ ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकाकडे जाणार आहे.विशेष म्हणजे,शासन अधिकारी,कर्मचाऱ्यांकडे कारभार सोपविणार आहे; तर दुसरीकडे गावगाडा हाकणारी संघटना सरपंच तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनाच प्रशासक नेमण्याची मागणी करीत आहे.
१४ हजार २३७ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक राज..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

