Wednesday, June 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त१० हजाराची होळ; पाणी न टाकताच घटाघटा पिला दारू.. - २१ वर्षीय...

१० हजाराची होळ; पाणी न टाकताच घटाघटा पिला दारू.. – २१ वर्षीय तरुणाचा ५ बॉटल दारूत खेल खतम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-काहीजण बऱ्याचदा आपले मित्र वा मैत्रिणींसोबत होळ म्हणजेच पैज लावीत असतात. कुणाला प्रपोज करणे,कुणाचा मोबाईल नंबर घेणे, एखाद्याला हसवणे वा इतर नाना तऱ्हेची होळ अनेकजण लावतांना आढळून येतात.मात्र,१० हजाराची होळ एका २१ वर्षीय तरुणास जीवघेणी ठरल्याची घटना कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात उघडकीस आली आहे.२१ वर्षीय तरुण व त्याचे काही मित्र यांनी ‘जो कोणी ५ बॉटल दारू पाणी न टाकता पिणार,त्याला १० हजार रुपये दिले जाणार’ अशी पैज लावली.यात कार्तिक नावाच्या २१ वर्षीय तरुणाने होकार देत पुढाकार घेतला.त्यावर कार्तिकचा मित्र असलेल्या व्यंकट रेड्डीने त्याला आव्हान दिले.५ बॉटल दारु पाणी न मिसळता पिऊन दाखव.तुला १० हजार रुपये देतो,अशी पैज रेड्डीने लावली.यानंतर १० हजार रुपये जिंकण्यासाठी कार्तिक पाणी न मिसळता ५ लीटर दारु प्यायला.त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. काही वेळातच त्याची प्रकृती गंभीर झाली.त्याला तातडीने कोलारच्या मुलबागलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले.पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.कार्तिकचा विवाह वर्षभरापूर्वीच झाला होता.आठ दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता.पैज जिंकण्याच्या नादात कार्तिकचा जीव गेला.कार्तिकच्या मृत्यूनंतर व्यंकट रेड्डी आणि सुब्रमणी याच्यासह ६ जणांविरोधात नांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.तर अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!