उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-लग्नाच्या दहा वर्षापर्यंत त्यांना मुळबाळ नव्हते.२०२१ मध्ये पत्नीने मुलीला जन्म दिला.मात्र, बाळ एक महिन्यातच मृत पावले.त्यामुळे प्रियंका नैराश्यात गेली होती.१० वर्षांनंतरही मुलबाळ नसल्याच्या तणावातून पोलिसाच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना रविवारी जरीपटकाच्या एलआयजी क्वॉर्टरमध्ये उघडकीस आली.प्रियंका राहुल मेश्राम वय ३४ वर्षे रा.हुडको कॉलनी असे मृत महिलेचे नाव आहे.राहुल मेश्राम हे राज्य राखिव पोलिस दलात नोकरीवर आहेत.शनिवारी रात्री राहुल हे नोकरीवर निघून गेले.मध्यरात्रीला तिने छताच्या कडीला गळफास लावला.दुसऱ्या दिवशी राहुल यांनी सकाळी प्रियंकाला फोन केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही.वारंवार फोन करूनही पत्नी प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी एका मित्राला घरी जाऊन पाहण्यास सांगितले.मित्र घरी गेला असता प्रियंका गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली.

