Saturday, September 5, 2026
Homeगोंदियादोन घोट चहा ठरला पोलीस जवानांसाठी घातक- नक्षल्यांच्या बेधुंद गोळीबारात दोन पोलीस...

दोन घोट चहा ठरला पोलीस जवानांसाठी घातक- नक्षल्यांच्या बेधुंद गोळीबारात दोन पोलीस जवान शहीत तर एक जखमी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील राज्याचा पूर्व टोक असलेल्या चांदसूरज गावापासून छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे.जवळच असलेल्या बोरतलाव येथे छत्तीसगड पोलिसांची चौकी आहे. नक्षलभाग असल्यामुळे छत्तीसगड पोलिस सतर्क असतात.रात्रभर ड्युटी करून रात्रीचा त्राण झटकण्यासाठी बोरतलाव चौकीचे तीन पोलिस जवान महाराष्ट्रातील चांदसुरज येथील ढाब्यावर चहा पिण्याकरिता गेले.चहा पिऊन परत जाताना रस्त्याच्या कडेला थांबले.सकाळी साडेआठची वेळ असल्याने आणि जवळच आले असल्याने त्यांनी सोबत शस्त्र नेले नव्हते.दरम्यान रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांना पोलिस जवान दिसताच त्यांनी बेधुंद गोळीबार करणे सुरू केले.पोलिस जवानांना काही कळण्याच्या आतच त्यांना बंदुकीच्या गोळ्या शरीर छेदून गेल्या.यात राजेश प्रतापसिंग आणि ललीत यादव या दोन पोलिस जवानांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.तर जखमी अवस्थेत एक जवान तिथून जीव वाचवून पळाला.नक्षल्यांनी हत्या केल्यानंतर त्यांच्या दुचाकीला देखील आग लावली.सीमावर्ती भागातील चळवळ संपुष्टात आल्याची अपेक्षा व्यक्त करत असतानाच ही घटना घडल्यामुळे नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.पोलिस जवानांची थोडीशी बेपर्वाई त्यांच्या जीवावर बेतली आहे.

महामार्गापासून २० फुटांवरील घटना

चांदसूरज हे गाव महाराष्ट्रात तर बोरतलाव हे गाव छत्तीसगड राज्यात आहे.दोन्ही गावांतील अंतर एक ते दीड किलोमीटर,बोरतलाव येथे चांगले दुकान नसल्याने तिनही जवान चांदसुरज नजीक असलेल्या ढाब्यावर सकाळी चहा पिण्याकरिता गेले होते.हा मार्ग दोन राज्यांना जोडणारा पक्का रस्ता आहे.रस्त्याच्या कडेला उभे राहून तिन्ही जवान बोलत असतांना आणि रहदारी सुरू असतांनाच रस्त्यापासून अगदी २० फूट अंतरावरच ही घटना घडली.त्यामुळे नक्षलवादी आधीच दबा धरून बसले होते.की त्यांना त्याची माहिती कुणीतरी पुरविली, हे तपासाअंती समोर येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!