- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या काही भागात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना स्थानिक तरुणांच्या संपर्कात येऊन त्यांचे ‘ब्रेनवॉश’ करून देशविघातक कृत्ये करण्यासाठी षडयंत्र रचण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती.संभाव्य घातपाती कारवायांचा धोका लक्षात घेता राज्याच्या सुरक्षेला बाधा आणू पाहणाऱ्या व देशविघातक कृत्ये करू पाहणाऱ्यांचे मनसुबे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस)हाणून पाडत राज्याच्या विविध भागांत तब्बल २१ ठिकाणी मध्यरात्री छापे टाकले.यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेडमध्ये १४ ठिकाणी,तर अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.सदरच्या छाप्या दरम्यान विशेष गोपनीयता बाळगण्यात आली.पहाटेच्या शांततेत सुरू
झालेल्या या मोहिमेने संशयितांचे धाबे दणाणले आहेत.तरुणांची दिशाभूल करून त्यांना दहशतवादाच्या वाटेवर नेणाऱ्या या साखळीचा मुख्य दुवा शोधण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाकडून मोठी मोहीम हाती घेण्यात आली.केवळ यवतमाळ जिल्ह्यात एटीएसची २० पथके तळ ठोकून असून, यामध्ये आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयास्पद घरांची झडती घेतली जात असून डिजिटल पुरावे आणि कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात येत आहे.कारवाईने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.
- Advertisement -

