- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काळ बदलत चाललाय.पूर्वी मुलीचे वडील मुलीच्या लग्नासाठी मुलगा बघायला मुलाच्या घरी जायचे.मात्र,काळानुरूप बदल होऊन आता मुलाचे वडील वा कुटुंबीय लग्नासाठी मुलगी आहे काय? असेल तर आम्हाला याबाबत कळवाल काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे अनेक तरुण ‘अधुरी कहाणी लग्नाची’ म्हणत वयोवृध्द होऊ लागले आहेत.अशातच नव तारुण्यात पदार्पण करणाऱ्या अल्पवयीन मुली प्रेमाच्या आणाभाका घेत घरून पळून जातांना दिसून येतात.त्यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत संपर्कात असल्याने काही मुली प्रेम प्रकरणाच्या जाळ्यात अडकतात,तर अनेक मुली घरच्यांच्या दबावाला घाबरून घर सोडतात.अल्पवयीन मुलींशी पालकांनी
योग्य संवाद साधणे अत्यावश्यक असते.त्यांचे मित्र-मैत्रिणी,इतर सहकारी यांची माहिती पालकांना असणे आवश्यक आहे.एखादी गोष्ट खटकली तर त्यांना विश्वासात घेऊन विचारणे योग्य ठरते.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या वयात अनावश्यक दबाव टाकणे टाळले पाहिजे.प्रेमप्रकरण,पैशांची चिंता,घरात होणारे वाद,अभ्यास किंवा लग्नासाठी दबाव,नातेवाइकांशी झालेले भांडण,घरातील वातावरण,घरात होणारा छळ,आजारपणाचा त्रास,बाहेरील जगाचे आकर्षण व विसंवाद यांमुळे मानसिकता बदलून अनेकदा अल्पवयीन मुली,महिला-पुरुष घर सोडून स्वतःचे निर्णय घेत बेपत्ता होत असतात.सोळावं वरीस धोक्याचे जरी असले तरीही घरच्यांनी याकडे लक्ष घालून अल्पवयीन मुलींची मानसिकता बदलणे गरजेचे झाले आहे.
- Advertisement -