नागपूर :- सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले असून नागरिकांची सोने खरेदी कमी होण्याचे नावच घेत नसल्याने सोन्याने पुन्हा उच्चांक गाठला आहे.राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात १७ जानेवारी २०२३ रोजी सोन्याचे दर ५६ हजारांहून अधिकचे प्रति १० ग्रॅम झाले आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी गरजांव्यतिरिक्त सोने खरेदी महत्वाची असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. सर्वसामान्यांपासून ते मोठ-मोठी गर्भ श्रीमंत व्यक्ती सोने खरेदीत गुंतवणूक करतांना दिसून येत आहेत.सोने खरेदीत गुंतवणूक केल्यानंतर अनेकांना अडचणींच्या काळात झटपट पैसा प्राप्त होत असल्याने सोन्याचे कितीही भाव वधारले तरीही कसलीही तमा न बाळगता सोने खरेदी केली जात आहे.सोन्याचे दर पुन्हा उच्चांक गाठण्याची शक्यता बळावली आहे.