Friday, May 1, 2026
Homeनागपूरसूरजागड लोहखनिज विदर्भाबाहेरील उद्योगांना अवैधरित्या विकल्या जात असल्याचा आरोप.. - मुंबई उच्च...

सूरजागड लोहखनिज विदर्भाबाहेरील उद्योगांना अवैधरित्या विकल्या जात असल्याचा आरोप.. – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला फटकारले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुकास्थित सूरजागड खाण लॉयड्स मेटल ॲण्ड एनर्जी कंपनीला ५० वर्षांच्या लीजवर देण्यात आली आहे.शासन आणि कंपनी सोबत २००७ मध्ये लीज करार झाला आहे.अशातच प्रकृती फाउंडेशन या सामाजिक संस्थेने ३ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्य सरकारला निवेदन सादर करून सूरजागडमधील लोहखनिज विदर्भाबाहेरील उद्योगांना अवैधरित्या विकल्या जात असल्याचा आरोप केला आहे.त्यावर सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही.त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काल बुधवारी सरकारला फटकारले व यावर उद्या शुक्रवारी स्पष्टीकरण सादर करा; असे निर्देश दिले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.दरम्यान, फाउंडेशनचे वकील ॲड.महेश धात्रक यांनी सरकारच्या उदासीन भूमिकेकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.न्यायालयाने १८ जानेवारी २०२३ रोजी फाउंडेशनच्या निवेदनावर निर्णय घेण्याचा आदेश सरकारला दिला होता.तसेच,याकरिता ३ मे व ७ जून २०२३ आणि ७ फेब्रुवारी २०२४ रोजीही आवश्यक निर्देश दिले होते.परंतु,सरकारने त्या आदेशाचे अद्याप पालन करण्यात आले नसल्याचे ॲड.धात्रक यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.त्यामुळे न्यायालयाने सदरची बाब गंभीरतेने घेतली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!