उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या सुकमा येथे आज, शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाले आहेत.सैन्याने एके-४७ रायफलींसह अनेक शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.आज शुक्रवारी पहाटे भांडारपदरच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांची शोधमोहिम राबवत असतांना अचानक चकमक सुरू झाली.यामध्ये १० नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे.चकमकीनंतर शोध मोहीम राबविली असता, आतापर्यंत १० जणांचे मृतदेह सापडले आहेत. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील कोंटा आणी किस्टाराम एरिया कमेटीचे नक्सली सदस्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.सुकमा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन भेजी क्षेत्राअंतर्गत कोराजुगुड़ा, दंतेसपुरम,नागाराम,भंडारपदरच्या जंगल क्षेत्रात चकमक झाली.
सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार; एके-४७ रायफलींसह अनेक शस्त्रास्त्रे जप्त…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES