- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची तीव्र कारवाई सुरू आहे.नुकतेच गुरुवार २० मार्च रोजी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत तब्बल ३० नक्षलवादी ठार झाल्याने नक्षली संघटनेस मोठा हादरा बसला होता.अशातच आता आज,मंगळवार २५ मार्चला दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी ३ नक्षलींचा खात्मा केला असून यामध्ये २५ लाखांचे बक्षीस असलेल्या सुधीर उर्फ सुधाकर उर्फ मुरली याचाही समावेश आहे. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरुन इंसास रायफल,३०३ रायफलसह मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त केला आहे.सध्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या गीडाम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गिरसापारा,नेलगोडा,बोडगा आणि इकेली या सीमावर्ती भागात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाली होती.यानंतर डीआरजी आणि बस्तर फायटरच्या पथकाने शोधमोहीम राबवली.यावेळी सुरक्षा दलांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला.यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन नक्षलवादी जागीच ठार झाले. अन्य दोन नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात असून चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य आणि दैनंदिन वापरातील साहित्य सापडल्या आहेत.वारंवार नक्षलवाद्यांविरोधात होणाऱ्या कारवायांमुळे नक्षलींनी धसका घेतला आहे.
- Advertisement -