Tuesday, September 22, 2026
Homeकोरचीसुडाने पेटलेला पुतण्या काकाला संपवूनच झाला शांत..!

सुडाने पेटलेला पुतण्या काकाला संपवूनच झाला शांत..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोरची(गडचिरोली):-शालेय शिक्षण घेत असतांना शिक्षक नेहमी सांगायचे, ‘राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे’ ज्याचे रागावर नियंत्रण आणि मनावर ताबा तो सर्वकाही जिंकू शकतो.पण,ज्याची तळपायाची आग मस्तकात गेली,तर असा व्यक्ती मागेपुढे न पाहता सर्वकाही गमावून बसतो आणि तसेच झाले गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम, आदिवासी भागातील कोरची तालुक्यात.सुडाने पेटलेला २० वर्षीय पुतण्या काकाला संपवूनच शांत झाल्याची घटना ६ मे रोजी कोरची तालुक्याच्या मुलेटीपदीकसा गावात उघडकीस आली. पुतण्याने झोपेत असलेल्या काकाच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून ठार केले.रामनाथ श्यामराव धुर्वे वय २० वर्षे, रा.मुलेटीपदीकसा,ता.कोरची,जि.गडचिरोली असे सनकी आरोपी पुतण्याने नाव आहे,तर पुनाराम बैसाकू धुर्वे वय ६५ वर्षे,असे मृत पावलेल्या काकाचे नाव आहे.
काही महिन्यांपूर्वी रामनाथचे डोके दुखत असल्याने त्याने आपल्या काका पुनारामांना सल्ला विचारला होता.त्यावर, डोके शांत ठेव,उगाच बडबड करत राहू नकोस,असा सल्ला काकाने त्याला दिला होता.यावर रामनाथ भभकला आणि मनात राग धरून होता.अश्यातच पुनाराम हे दोन दिवसांपूर्वी गावाजवळील शेतातील झोपडीत झोपण्यासाठी गेले होते.गाढ झोपेत असतांनाच रामनाथने पुनाराम यांच्या मानेवर कुऱ्हाडीने जोरदार प्रहार केला.यातच त्यांचा मृत्यू झाला.हत्या करताच आरोपी रामनाथने घटनास्थळीच कुऱ्हाड फेकली व पसार झाला.दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल बुधवारी काही नागरिकांना पुनाराम हे शेतातील झोपडीत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.लागलीच घटनेची माहिती कोरची पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच कोरची पोलीस ठाण्याचे ठाणेदार शैलेंद्र ठाकरे यांनी पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तपासाची चक्रे गतीने फिरवली.त्यानंतर,कोरची पोलीस ठाण्याचे एपीआय मुकुंद देशमुख व पीएसआय योगेश पवार यांच्या पथकाने सनकी आरोपी रामनाथला त्याच्या घरून अटक केली. आरोपी रामनाथ यांस आज गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!