उद्रेक न्युज वृत्त
उत्तरप्रदेश :- उत्तर प्रदेशातील अयोध्या पोलिसांनी बलात्कार आणि हत्येप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे.पोलिसांना गेल्या ५० दिवसात चार वयस्कर महिलांचे मृतदेह आढळले होते.या महिलांवर बलात्कार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. बाराबंकी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण पीडित महिलांना ओळखत नव्हता. त्याने कोणतेही कारण नसताना या महिलांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या अटकेत आहे.चौकशीत त्याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
अयोध्याचे अतिरिक्त सहाय्यक पोलीस आयुक्त कुमार सोनकर याांनी दिलेल्या माहितीनुसार,अमरेंद्र याने बाराबंकी येथील तीन आणि अयोध्येतील एका महिलेची हत्या केली.त्याने ही चारही हत्या करण्यासाठी एकच पद्धत अवलंबली.आधी त्याने महिलांवर बलात्कार केला आणि नंतर त्यांची हत्या केली.महिलांचे मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीचे चित्र प्रसिद्ध केले होते.बाराबंकी पोलिसांची सहा पथके आरोपीचा शोध घेत होती.पोलिसांनी लोकांनाही आरोपीला पकडण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते.
(साभार:-झी २४ तास)