Thursday, May 28, 2026
Homeनागपूरसावधान..! सोशल मीडियावर एटीएसची करडी नजर.. - एका शिक्षकासह व्यापाऱ्यास घेतले ताब्यात..

सावधान..! सोशल मीडियावर एटीएसची करडी नजर.. – एका शिक्षकासह व्यापाऱ्यास घेतले ताब्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सोशल मीडियाचे जाळे खूप दूरवर पसरलेले आहेत.याचा वापर काहीजण मनोरंजन म्हणून करतोय, तर काहीजण देश विघातक कृत्य करण्यासाठी करू लागला आहे.२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगामपासून काही किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बैसरन व्हॅली येथील मैदानावर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी घोडेस्वारीचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला होता.दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता.दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.युद्धबंदीची घोषणा करून युद्ध विराम झाले असले तरीही एकमेकांविषयीची द्वेष भावना अजूनही कायमच आहे.अश्यातच पाकिस्तानमधील नागरिकांच्या संपर्कात असलेल्या भारतीय नागरिकांवर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर आहे.करडी नजर असतांनाच नागपूरच्या कामठीतील एक शिक्षक आणि एक व्यापारी पाकिस्तानमधील सोशल मीडियाच्या ग्रुपवर सक्रिय असल्याचे लक्षात आले.सदरची बाब लक्षात येताच एटीएस म्हणजेच दहशतवादविरोधी पथक यांनी ४२ वर्षीय एका शिक्षकासह ४० वर्षीय व्यापाऱ्यास ताब्यात घेऊन दोघांच्याही मोबाइलमधील डेटा जप्त करून दिवसभर चौकशी केल्यानंतर दोघांची सुटका करण्यात आली.त्यांनी सोशल मीडियाच्या ॲपवरून पाकिस्तानमधील काही नागरिकांशी संवाद साधल्याचे निष्पन्न झाले आहे.प्रकरणी दोघांवर अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झाला नसला तरीही गरज भासल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येईल,असे एटीएसचे सहाय्यक पोलिस आयुक्त संतोष वैरागडे यांनी
स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहा वर्षांपेक्षा जास्तकाळ कार्यरत असलेल्या इतर अनेक अभियंत्यांची यादी उपलब्ध असतांना केवळ मलाच लक्ष्य केले जाते.. – कोरचीतील नाडेकल पुलाशी संबंध नसल्याचा कार्यकारी अभियंता...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात भ्रष्टाचार,अनियमितता तसेच नाडेकल पुलाच्या बांधकामासंदर्भात माध्यमातून प्रसिद्ध आरोप निराधार असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे कार्यकारी...

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!