उद्रेक न्युज वृत्त
सत्यवान रामटेके (संपादक)
गडचिरोली :- हल्ली काही युवकांना व सुजाण नागरिकांना मोठ्या प्रमाणावर ऑफरच्या नावाखाली व्हॉट्स ॲप वरती लिंक वा मॅसेज पाठविला जातो आहे.त्यामध्ये अदाणी,अंबानी व इतर व्यक्तींनी एवढा इंटरनेट डाटा वा आपणांस कार,दुचाकी वाहन लागली आहे.सदर मॅसेज १० गृप वरती पाठवा व बक्षीस मिळवा.असे प्रलोभन दाखवून बळी पाडले जात असल्याने अशा फुकटच्या प्रलोभनास बळी पडू नये; अन्यथा महागात पडणार आहे.
मोठ्या व्यक्ती आणि नामांकित कंपनीच्या नावाखाली सामान्य ग्राहकांना लुटणारी टोळी व्हॉट्स ॲपवर सक्रिय झाली असून,या माध्यमातून अनेकांची फसवणूक होत आहे.केवळ मोबाइल डेटा मिळविणे आणि युजरची संख्या वाढविण्यासाठी असे प्रयोग होत असल्याचे समोर येत आहे.पाठविलेला मॅसेज एकाकडून १० व्यक्तींकडे आणि १० व्यक्तींकडून हजारो व्यक्तींकडे पाठविले जात असल्याने आपली संपूर्ण माहिती समोरील व्यक्ती चोरून व नंतर आपल्याशी संपर्क साधून चुना लावण्याचे काम करीत असतात.नंतर आपण म्हणतो की,आपली माहिती समोरील व्यक्तींकडे कशी गेली.फसव्या नेटवर्क जोडणीचे मॅसेज व्हॉट्स ॲप वर जाणीवपूर्वक पसरविले जात असून,अशांपासून अगोदरच सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
पोलिस गुन्हे शाखेच्या सायबर सेलने अशांवर पाळत ठेवून सदर फेक मॅसेज पाठविणाऱ्या जाळेचा शोध घेऊन यातील प्रमुख टोळीचा पर्दाफाश करावी; अशी मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.