Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीसावधान..! बोगस बांधकाम कामगार नोंदणी करणाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल.. - ९० दिवस...

सावधान..! बोगस बांधकाम कामगार नोंदणी करणाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल.. – ९० दिवस कामाचे बनावट प्रमाणपत्र प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत ९० दिवस कामाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील
 रामपूर येथील एका इसमाविरूद्ध चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाच्या निर्देशानुसार कामगार कल्याणकारी योजनांमध्ये बोगस कागदपत्रे व दलालांच्या वाढत्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता पथक समितीची स्थापना करण्यात आली आहे.या पथकात गोंदिया व गडचिरोली येथील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.या पथकाने शुक्रवार ४ जुलै २०२५ रोजी नगर परिषद चामोर्शी येथे भेट देऊन ९० दिवसांच्या कामाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली.पडताळणी अंती कार्यालयाने स्पष्ट केले की,कोणतेही प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयातून निर्गमित करण्यात आलेले नाही.या बाबतचा अधिकृत लेखी खुलासा मुख्याधिकारी नगर पंचायत चामोर्शी यांनी दिला असता प्रकरणाची दखल घेत सरकारी कामगार अधिकारी सिमा शिंदे यांनी चामोर्शी पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.शासनाच्या कामगार कल्याणकारी योजनांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी अशा प्रकारच्या बोगस कृत्यांविरोधात कारवाई सुरू असून, इतर प्रकरणांचीही चौकशी सुरू असल्याचे सिमा शिंदे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!