Wednesday, July 15, 2026
Homeगोंदियासावधान..! फेसबुक अकाउंट चालवित असतांना एक कॉल केला अन् सात लाख गमावून...

सावधान..! फेसबुक अकाउंट चालवित असतांना एक कॉल केला अन् सात लाख गमावून बसला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची ऑनलाईन फसवणूक होत असल्याची प्रकरणे सर्वत्र उघडकीस येऊ लागल्याने बँक तसेच शासनाच्या वतीने वेळोवेळी ऑनलाईन फसवणुकीपासून वेळीच सावध होण्याच्या सूचना केल्या जातात.पण,अश्या सूचनांकडे अनेकजण दुर्लक्ष करून पै-पै जमा केलेली जमापूंजी क्षणात गमावून बसतात.कुठलीही बँक ग्राहकांशी विनाकारण संपर्क साधत नसते.संपर्क साधत असेल तर अश्यांनी स्वतः बँकेत जाऊन खातरजमा करणे आवश्यक आहे.मात्र,आपण तसे न करता एखाद्या अमिषाला बळी पडतो व सर्वकाही गमावून बसतो.अश्याच प्रकारे सुशिक्षित आणि कर्मचारी तरुण सायबर फसवणुकीचा बळी ठरला आहे.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेत डेमोशेड विभागात कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत अनुराग गुरुवारी दुपारी २ वाजता घरी असतांना मोबाइलवर फेसबुक अकाउंट चालवित होता.त्यावेळी त्याला फेसबुकवर योनो ॲपचे अकाउंट उघडण्यासाठी मोबाइल क्रमांक दिसला.त्यावर या नंबरवर फोन करा,असे लिहिले होते.त्यावर अनुरागने फोन करून आपल्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये खाते असल्याने मला योनो ॲप माझ्या मोबाइलवर सुरू करायचे आहे,म्हणून फोन केला अन् येथेच त्याची फसवणूक झाली.आरोपीने अनुरागला मी अभिषेक शर्मा स्टेट बँक ऑफ इंडियामधून बोलतोय,तुम्हाला योनो ॲप इंस्टॉल करायचे आहे का? असे विचारून होकार देताच त्यांच्या व्हॉट्सॲपवर एक yono sbi.apk नावाची फाइल पाठवली.ती फाइल कॉल चालू असतांनाच उघडण्यास सांगितली.ती फाइल उघडली व यादरम्यान त्याने अनुरागला सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागणार आहे,तुम्ही कॉल चालू ठेवा,असे सांगितले.तब्बल २५ ते ३० मिनिटे त्या दोघांचा संवाद सुरू राहिला.त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन कर्ज मिळवून देतो,असे आमिष दाखवून सात लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.अनुराग विश्वनाथ गोसेवाडे वय ३८ वर्षे,रा.डबलिंग कॉलनी,सिव्हील लाइन,गोंदिया हा तरुण रेल्वे विभागात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे.त्याने अनुरागला ‘आपल्या नावावर कर्ज मंजूर झाले आहे.तुम्हाला फक्त एक ॲप डाऊनलोड करावे लागेल व खाते सक्रिय करावे लागेल,’ असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.यानंतर व्हॉट्सॲपवर ‘लोन सॅक्शनची फाइल’ पाठवून त्यांचे सर्व वैयक्तिक आणि बैंक तपशील मिळविले.अनुरागने आरोपीचा कॉल ठेवल्यानंतर त्याला आलेले एसएमएस बघितले,तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर सात लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज मंजूर झाले होते.कॉल चालू असतांनाच त्या रकमेपैकी एक लाख ६० हजार रुपये,एक लाख २० हजार रुपये व एक लाख ५० हजार रुपये,असे एकूण पाच लाख रुपये वेगवेगळ्या खात्यावर आणि ५० हजार रुपये वेगळ्या खात्यावर ट्रान्सफर केल्याने आपली फसवणूक होत असल्याचे अनुरागच्या लक्षात आले. वेळीच दक्ष होऊन उर्वरित रकमेपैकी २० हजार आपल्या पत्नीला पाठविले व १९३० या क्रमांकावर फोन करून सायबर सेलला तक्रार केली.त्यावरून ६१ हजार रुपये होल्डवर आहेत.एवढेच नव्हे,तर आरोपीने अनुरागच्या खात्यातून एकूण सात लाख रुपये काढून घेतले.काही वेळाने खात्यातून रक्कम वजा झाल्याचे लक्षात येताच अनुरागने शहर पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!