Monday, December 8, 2025
Homeमुंबईसावधान..! आयआयटीच्या एका विद्यार्थ्याची डिजिटल अरेस्टमध्ये ७ लाखाची फसवणूक..

सावधान..! आयआयटीच्या एका विद्यार्थ्याची डिजिटल अरेस्टमध्ये ७ लाखाची फसवणूक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-मुंबईतील आयआयटीच्या एका विद्यार्थ्याची डिजिटल अरेस्टमध्ये तब्बल ७ लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचा प्रकार उजेडात आला असून विद्यार्थ्याला फसवण्यासाठी भामट्यांनी दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) नावाखाली बनावट व्हॉट्सॲप कॉल करून त्याच्यावर आरोप लावले आणि मोठी रक्कम उकळली.या प्रकारामुळे सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत जागरूक राहण्याची गरज आहे.विद्यार्थ्याला एका अज्ञात व्हॉट्सॲप नंबरवरून कॉल आला.कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला TRAI चा  अधिकारी असल्याचे भासवले.या व्यक्तीने विद्यार्थ्याला सांगितले की,त्याच्यावर डिजिटल अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आले आहे.हा वॉरंट त्याच्या मोबाईल नंबरशी संबंधित असल्याचे सांगून त्याला मोठ्या कायदेशीर अडचणीत पडण्याची भीती दाखवण्यात आली. फसवणूक करणाऱ्यांनी विद्यार्थ्याला सांगितले की,हा वॉरंट रद्द करण्यासाठी लगेच रक्कम भरली पाहिजे,अन्यथा त्याला तुरुंगवास होईल.विद्यार्थ्याला खोट्या कायदेशीर गोष्टींच्या जाळ्यात अडकवून घाबरवले गेले.त्यासाठी त्यांनी अत्यंत हुशारीने अधिकृत भाषा आणि गंभीर स्वर वापरून त्याच्यावर दबाव आणला.भामट्यांनी विद्यार्थ्याला विविध खात्यांमध्ये ७ लाख रुपयांचे व्यवहार करण्यास भाग पाडले.घाबरलेल्या विद्यार्थ्याने त्यांच्या सूचनांनुसार पैसे ट्रान्सफर केले. पैसे पाठवल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच विद्यार्थ्याने सायबर क्राइम विभागात तक्रार दाखल केली.पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.या घटनेमुळे डिजिटल फसवणुकीच्या प्रकारांविरोधात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

डिजिटल अरेस्ट पासून असा करा बचाव👇
१) तुमची वैयक्तिक माहिती कुणालाही शेअर करू नका
२) संशयास्पद कॉल्सवर लगेचच संबंधित संस्थांशी थेट संपर्क साधा
३) सरकारी संस्था किंवा अधिकारी वैयक्तिक खात्यावर पैसे मागत नाहीत
४) अनोळखी कॉल किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नका
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोलीत साहित्यिकांची मांदियाळी..! नाट्यश्रीचा वाङ्ममय पुरस्कार सोहळा व काव्य संमेलन संपन्न.. – इंग्लंड,गोवा,बुऱ्हाणपूर,बंगलोर येथील साहित्यिकांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंचच्या वतीने आयोजित महामृत्युंजय वाङ्ममय पुरस्कार सोहळा तसेच कवी संमेलनासाठी राज्यभरातून तसेच देश विदेशातून साहित्यिकांची मांदीयाळी काल,रविवार ७...

एका ठिकाणी पती-पत्नीने; तर दुसऱ्या ठिकाणी टॉप टेन नक्षलवाद्यांनी सोडली लाल दहशत..

उद्रेक न्युज वृत्त :-दुर्गम भागात बऱ्याच कालावधीपासून लाल दहशतीचे सावट पसरले होते.यामुळे तेथील विकास कोसोदुर राहिला आणि अजूनही काही ठिकाणी जैसे-थे अवस्था पहावयास मिळत...

अजब रोमियोचा गजब कारनामा..! नर्सिंग कॉलेजात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला रस्त्यात गाठले अन् गालाचा घेतला मुका.. – आरोपीची तुरुंगात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपुर :-जिल्ह्याच्या भिवापूर शहरात अजब रोड रोमियोचा गजब कारनामा उघडकीस येताच पोलिसांनी अटक केल्यानंतर लागलीच त्याला भिवापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयापुढे...

दौलत कुथे ‘नाट्यश्री २०२५’ पुरस्काराने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली यांच्या वतीने आयोजित ‘महामृत्युंजय वाड्:मय स्पर्धा २०२५’ पुरस्कार वितरण सोहळा काल,रविवार ७ डिसेंबर रोजी जिल्हा मध्यवर्ती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!