Thursday, September 24, 2026
Homeगडचिरोलीसायबर फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल व्यवहारात सतर्कता आवश्यक- इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचे राज्य...

सायबर फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल व्यवहारात सतर्कता आवश्यक- इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचे राज्य समन्वयक संजय त्रिपाठी – अनोळखी लिंक,संदेश अथवा आमिषांना प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांची खातरजमा करावी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असतांना सायबर गुन्ह्यांच्या पद्धतीही बदलत आहेत.ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक माहितीच्या गैरवापरापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी डिजिटल व्यवहार करतांना सतर्क राहावे.अनोळखी लिंक,संदेश अथवा आमिषांना प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांची खातरजमा करावी,असे आवाहन राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे माहिती व तंत्रज्ञान संचालक तथा इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचे राज्य समन्वयक संजय त्रिपाठी यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोली आणि महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे ‘सायबर सुरक्षा-सुरक्षित रहा,जागरूक रहा’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात त्रिपाठी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांना सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंबाबत मार्गदर्शन केले.जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजकुमार मुसाने तसेच इतर प्राध्यापक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते
  • ऑनलाइन व्यवहार करतांना सतर्कता आवश्यक👇
ऑनलाइन बँकिंग व डिजिटल व्यवहार करतांना  अधिकृत संकेतस्थळ आणि ॲपचाच वापर करावा. मोबाईल किंवा ई-मेलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.ओटीपी,पासवर्ड,बँक खाते अथवा आर्थिक व्यवहारांशी संबंधित गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये.लॉटरी,नोकरी,बक्षीस किंवा आकर्षक आर्थिक लाभाचे आमिष दाखविणाऱ्या संदेशांवर खातरजमा केल्याशिवाय विश्वास ठेवू नये, असे त्रिपाठी यांनी सांगितले.
अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून मोबाईलमध्ये कोणतेही ॲप डाउनलोड करू नये किंवा आर्थिक व्यवहार करू नयेत.सायबर सुरक्षेसाठी तांत्रिक उपायांसोबतच प्रत्येक वापरकर्त्याची जागरूकता आणि सावधगिरी महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
  • सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती जपून शेअर करा👇
सोशल मीडिया वापरतांना वैयक्तिक माहिती,मोबाईल क्रमांक,लोकेशन,प्रवासविषयक माहिती आणि खासगी छायाचित्रे सार्वजनिकपणे शेअर करतांना विशेष दक्षता घ्यावी.सोशल मीडिया व ई-मेल खात्यांसाठी मजबूत व वेगवेगळे पासवर्ड वापरावेत. टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू ठेवावे तसेच अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट आणि संदेशांबाबत सावध राहावे,असे त्यांनी सांगितले.
सायबर बुलिंग,आवाजाची नक्कल,बनावटी चेहरा, बनावट सोशल मीडिया प्रोफाईल आणि आयडेंटिटी थेफ्ट अर्थात ओळख चोरी यांसारख्या सायबर गुन्ह्यांची माहिती देतांनाच अशा प्रकारची घटना घडल्यास ती लपवून न ठेवता तातडीने संबंधित यंत्रणेकडे तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
  • आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने ‘१९३०’ वर संपर्क साधा👇
ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यानंतर तातडीने कार्यवाही करणे महत्त्वाचे आहे.फसवणूक लक्षात येताच राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा अथवा राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल cybercrime.gov.in  वर तक्रार नोंदवावी, असे यावेळी सांगण्यात आले.
सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांनी भीती न बाळगता सतर्क राहणे,पुरावे सुरक्षित ठेवणे आणि शक्य तितक्या लवकर अधिकृत यंत्रणेकडे तक्रार करणे आवश्यक असल्याचेही मार्गदर्शन करण्यात आले.
  • थेट प्रसारणातून व्यापक जनजागृती👇
कार्यक्रमाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट प्रसारण करण्यात आले.त्यामुळे महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांसोबतच जिल्ह्यातील विविध भागांतील नागरिक आणि युवकांनाही सायबर सुरक्षेबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी उपलब्ध झाली.विशेषतः दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचविण्यासाठी थेट प्रसारणाचा उपयोग करण्यात आला.
डिजिटल सेवांचा सुरक्षित वापर,सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी आणि फसवणूक झाल्यास उपलब्ध असलेल्या तक्रार निवारण यंत्रणेबाबत नागरिक व युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध विषयांबाबत नागरिकांशी थेट संवाद साधून तज्ज्ञांच्या माध्यमातून उपयुक्त माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा माहिती कार्यालय तसेच महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कृषी विभागातील तब्बल १४ हजार ४४५ तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांना एक दिवसांचे वेतन..

उद्रेक न्युज वृत्त :-निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकरी बांधवांना फटका सहन करावा लागतो आहे. कधी अवकाळी पाऊस,तर कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी ऐन हंगामात धो-धो पावसामुळे...

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!