Tuesday, July 28, 2026
Homeगोंदियासात लाखाचे बक्षीस असलेल्या २७ वर्षीय नक्षलीचे आत्मसमर्पण...

सात लाखाचे बक्षीस असलेल्या २७ वर्षीय नक्षलीचे आत्मसमर्पण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-लहानपणापासून नक्षल प्रभावित भागातील चळवळीत सहभागी होऊन विविध दलमध्ये कार्यरत असणाऱ्या २७ वर्षीय नक्षलीने गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.
सात लाखाचे बक्षीस असलेल्या देवा उर्फ अर्जुन उर्फ राकेश सुमडो मुडाम,वय २७ वर्षे रा.गुंडम सुटबाईपारा, पोस्ट-बासागुडा, तहसील-ऊसुर,पो.स्टे. पामेड,जिल्हा- बिजापुर (छत्तीसगढ) असे आत्मसमर्पीत नक्षल्याचे नाव आहे.
देवा ऊर्फ अर्जुन याचे मुळ गाव बिजापूर जिल्ह्यातील अतिनक्षल प्रभावित भागात आहे.त्यामुळे गावात नक्षल्यांचा जत्था गावात बस्तान करायचा.त्यामुळे लहानपणापासूनच तो नक्षल चळवळीत सहभागी होऊन बाल संघटनमध्ये काम करीत होता.२०१४ मध्ये तो पामेड दलममध्ये (दक्षीण बस्तर) भरती झाला व शस्त्र हातात घेतले.पामेड दलममध्ये ६ महिने काम केल्यानंतर २०१४ च्या अखेरीस त्याने अबुझमाड परिसरात अडीच महिन्याचे प्रशिक्षण घेतले.ते पूर्ण केल्यानंतर त्याला २०१५ मध्ये माओवाद्यांचे बस्तर भागातून महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड झोनमध्ये पाठवले.सुरुवातीला त्याने दलम सदस्य म्हणून २०१५ ते १६ पर्यंत तांडा दलम व २०१६ ते १७ पर्यंत मलाजखंड दलम मध्ये काम केले.विविध भागात मोठ्या प्रमाणावर रात्रंदिवस त्रासदायक कामे करावी लागत असल्याने जिल्हाधिकारी व पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!