Wednesday, July 29, 2026
Homeगोंदियासाखरपुड्याचा कार्यक्रम आटोपला; लग्नात क्रेटा गाडी किंवा १५ लाख रुपये द्या म्हणून...

साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपला; लग्नात क्रेटा गाडी किंवा १५ लाख रुपये द्या म्हणून लग्न मोडला.. – ६ जणांवर हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपल्यावर हुंड्याच्या स्वरूपात क्रेटा गाडी किंवा १५ लाख रुपये द्या,अशी मागणी करीत उपवराकडील मंडळींनी लग्न मोडले.यासंदर्भात काल,शनिवारी २२ फेब्रुवारीला ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ग्राम चांदणीटोला येथील २६ वर्षीय मुलीसोबत भंडारा जिल्ह्यातील साईमंदिर रोड विनोबा नगर तुमसर येथील मुलगा नितीन बाबुलाल उपराडे वय ३४ वर्षे याचे लग्न जुळले होते.रीतिरिवाजाप्रमाणे ३१ जानेवारी रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपला. लग्नात क्रेटा गाडी किंवा १५ लाख रुपये द्या,अशी मागणी मुलाकडील मंडळीकडून करण्यात आली. मुलीकडील मंडळींनी हुंडा देण्यास नकार देताच मुलाकडून ते लग्न मोडले.या घटनेसंदर्भात काल २२ फेब्रुवारी रोजी आरोपी मुलगा नितीन उपराडे,त्याची आई सुशीला बाबुलाल उपराडे वय ५५ वर्षे,बहीण प्रेरणा अरुण तिवडे वय ३० वर्षे, रा.साईमंदिर रोड विनोबा नगर,तुमसर,मुलाचा मामा भागचंद गराडे वय ५० वर्षे,रा.कारंजा, ता.जि.गोंदिया, पुरुषोत्तम दमाहे वय ५५ वर्षे,रा.गणेश लॉनचे मागे, तुमसर,सेवक चिखलोंडे वय ५४ वर्षे,रा.जब्बारटोला, ता.जि.गोंदिया या सहा जणांवर हुंडा प्रतिबंधक कायदा कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास हवालदार देवाजी बहेकार करीत आहेत.२२ जानेवारी रोजी सेवक चिखलोंडे याच्या मार्फतीने लग्न जुळले होते. आरोपी नितीन बाबुराव उपराडे हा बंगळुरू येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!