उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- कित्तेक वर्षांपासून अतिक्रमण धारकांची संख्या दिवसेंदिवस बळावली आहे.केवळ देसाईगंज शहरातच नव्हे तर सगळीकडे हीच परिस्थिती निर्माण झाली आहे.छोटी-मोठी दुकाने थाटून उदरिर्वाहासाठी जागेवर अतिक्रमण केले जात आहे.अशाच प्रकारचे अतिक्रमण देसाईगंज शहरातील फवारा चौकात झाल्याचे उघड झाले आहे.
देसाईगंज शहरातील स्वातंत्र्य संग्राम सेनानी चतुर्भुज जोशी यांना शासनाकडुन काही वर्षांपूर्वी फवारा चौकातील लक्ष्मी लॉज हॉटेल जवळील जमिनीचा पट्टा बहाल करण्यात आला होता.मात्र अनेक वर्षांपासून दिलेल्या जमिनीवर अनेक छोटी-मोठीव्यावसायिकांनी अतिक्रमण करून जागा हडप केली.जागा हडप केल्यानंतर स्वातंत्र्य संग्राम सेनानी चतुर्भुज जोशी यांना शासनाकडुन काही वर्षांपूर्वी फवारा चौकातील दिलेल्या जागेचा प्रश्न उद्भवला असल्याने कायदेशीर लढाई करणे तितकेच महत्त्वाचे होते.सर्व प्रकारावरून चतुर्भुज जोशी यांचे वारसदार श्यामसुंदर जोशी यांनी कायदेशीर लढाई करण्यास सुरुवात केली.त्यानुसार श्यामसुंदर जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर न्यायालयात धाव घेतली.नागपुर उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने योग्य तो न्याय निर्वाळा देऊन फवारा चौकातिल सर्व अतिक्रमण काढुन टाकण्याचे आदेश दिल्याने अतिक्रमणाचा तिढा कायमचा सुटला व त्यानुसार ११ फेब्रुवारी पासून आज १२ फेब्रुवारी २०२३ ला सुद्धा अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत आहे.