उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :- जम्मू-काश्मीरमध्ये भारताच्या हाती मोठा खजिना लागला आहे.या खजिन्यामुळे संपूर्ण भारताचे नशिब पालटणार आहे.यामुळे भारतात मोठा पैसा येईल आणि अर्थव्यवस्था वाढण्यासाठी मदत होणार आहे.अधिक माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये एकूण ५.९ लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे.यामध्ये वाहतूक उद्योगाला मोठी चालना मिळेल; अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.भारतात झालेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार जम्मूच्या सलाल-हिमाना भागामध्ये हा खजिना सापडला आहे.इथे एकूण ५१ ब्लॉक सापडले आहेत.यापैकी ५ ब्लॉक्स लिथियम,गोल्ड,पोटॅश,मॉलिब्डेनमचे आहेत.हा खजिना शोधण्यासाठी १०१८-१९ ला सुरुवात करम्यात आली होती.इतकेच नाहीतर १७ ब्लॉक हे कोळश्याच्या साठ्याचे असल्याचेही सांगण्यात येत आहे.खरंतर, एवढ्या मोठ्या प्रमाणात लिथियम सापडणे ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे.