उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-देसाईगंज तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी वर्गांनी शेतीच्या सततच्या नापिकीमुळे कंटाळून शेती विकण्याचा सपाटा लावला आहे.शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये काही राम नाही म्हणून कोट्यवधी व लाखो रुपयास शेत्या विकण्यास सुरुवात केली आहे.
शेतीमधून पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न होत नसल्याने लागत खर्च जास्त व उपन्न कमी यामुळे कंटाळुन खाजगी शेती विकत घेणाऱ्या व व्यवसाय करणाऱ्या खरेदीदारांना शेती विकण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी बांधवांचे नशिबी कधी जास्तीचा पाऊस तर कधी कमी पाऊस,कधी महापूर तर कधी नापिकी,कधी किडीचा प्रादुर्भाव तर कधी पिकांची नासाडी,कधी बँकांचे कर्जाचे डोंगर तर कधी पैस्यांची कमतरता अशी बरीच प्रश्ने शेतकरी बांधवाना नेहमी भेडसावत असतात.
त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे कशी सोडवावी असाही प्रश्न शेतकरी बांधवांना सतत भेडसावत असतो.शासन स्तरावरून शेतकऱ्यांची प्रश्ने सोडवायला वेळच नाही.शेतकरी बांधवांचे समस्यांचे निराकरण करण्यास कुणाकडे वेळच उपलब्ध नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल होऊन शेती विकण्याकडे वळलेला दिसतो.भविष्यात शेत्या दिसणार की नाही?असा विचार मनात घर करून सोडत आहे.