Monday, May 18, 2026
Homeगडचिरोलीसकाळी नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांवर जंगली हत्तींचा हल्ला; तीन महिला जखमी.....

सकाळी नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांवर जंगली हत्तींचा हल्ला; तीन महिला जखमी.. – एकीला नागपूरला हलविले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मागील दोन महिन्यांपासून जंगली हत्तींचा कळप गडचिरोली व आरमोरी तालुक्यात घिरट्या घालत आहे.आठ दिवसांपूर्वी हत्तीचा कळप आरमोरी तालुक्यातील किटाळी परिसरात होता. घुमजाव करीत कळप पुन्हा दिभनामार्गे गुरवळा परिसरात दाखल होऊन गुरुवारी गडचिरोली तालुक्याच्या गुरवळा येथील शेखर उईके यांच्या तीन एकरांतील मक्याचे नुकसान केले होते.अशातच आता जंगली हत्तींचा कळप गडचिरोली तालुक्यात ठाण मांडून असून आज,शनिवार २६ एप्रिलला सकाळी नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांवर जंगली हत्तींनी हल्ला चढवून तीन महिलांना गंभीर जखमी केले आहे.सदरची घटना गडचिरोली तालुक्याच्या कृपाळा गावात सकाळी १० च्या दरम्यान घडली. सुशीला टेमसू मेश्राम,योगीता उमाजी मेश्राम व पुष्पा निराजी वरखडे अशी जखमी महिलांची नावे असून, यातील सुशीला मेश्राम हिला गंभीर दुखापत झाल्याने नागपूरला हलविण्यात आले आहे,तर अन्य दोघींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.सकाळच्या सुमारास गावातील काही महिला गावाजवळ असलेल्या नदीतीरावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.अशातच अचानकपणे जंगली हत्तींचा कळप महिलांच्या जवळ आला.यात जवळपास १८ हत्तींचा समावेश असल्याची माहिती आहे.कळप येत असतांनाच काही महिला पळून गेल्या.यातच तीन महिलांवर जंगली हत्तींनी हल्ला चढवला.यातील सुशीला मेश्राम हिला जंगली हत्ती आपटल्याने ती बेशुद्ध पडली.नागरिकांच्या लक्षात येताच घटनास्थळाकडे धाव घेतली.अशातच सुशीला मेश्रामला बेशुद्धावस्थेतच नागपूरला हलविण्यात आले आहे.तर दोन महिलांवर गडचिरोली रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!