Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीसंविधांनामुळे आज आपण उभे आहोत; हि बाबासाहेबांची देण……भोजराज कान्हेकर…..

संविधांनामुळे आज आपण उभे आहोत; हि बाबासाहेबांची देण……भोजराज कान्हेकर…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केले; म्हणुन आज आपण सर्व बाबासाहेबांच्या संविधानामुळे उभे आहोत.डॉ.बाबासाहेबांचे स्वप्न होते की संपूर्ण देश बौद्धमय करीन; परंतु त्यांचे अपुरेच असल्याने हि जबाबदारी आपल्यावर येवुन ठेपली आहे.अश्या प्रकारचे मार्गदशन कान्हेकर यांनी गडचिरोली तालुक्यातील पोटेगांव येथील कार्यक्रमा प्रसंगी केले.बहुउद्देशिय मंडळ पोटेगांवच्या वतीने दिक्षाभूमी पोटेगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यकम प्रा.मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला व त्यांना ध्वजारोहन करण्याचा बहुमान मिळाला.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन भोजराज कान्हेकर तर प्रमुख अतिथी म्हणुन आदिवासी युवा नेते विनोद मडावी,भोयर,मेश्राम, वनक्षेत्रपाल चौधरी,डॉविजय रामटेके आदि लाभले होते.याप्रसंगी प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी सांगितले की , डॉ.बाबासाहेब आबेडकरांनी तमाम बाधवांना धम्माची दिक्षा देताना नागपूर मधे R S S आहे म्हणुन नाही तर नागपूर मधे नाग वंशज लोकांची वस्ती होती.आर्य आणि नाग लोकांमधे युद्ध व्हायचे हे सर्व शांतीच्या मार्गाने बुद्धाकडे वळले पाहीजे म्हणुन विजया दशमीच्या दिवशी बाबासाहेबांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली.तो दिवस १४ ऑक्टोबर होता. प्रंसगी डॉ.विजय रामटेके, विनोद मडावी,भोयर आदींनी भाषणे दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सामाजीक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुजमकर यांनी तर आभार दिवाकर फुलझेले यांनी मानले. कार्यक्रमास सिद्धार्थ,गोवर्धन,देवाजी,बांबोळे,लेनिन कुकडकर रामटेके,संगिता मुजमकर,कल्पना फुलझेले, प्रतिज्ञा मंजुमकर,इंदिरा कुकुडकर सहीत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!