Friday, May 1, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी,गडचिरोली पोलिसांचे मोठे यश…-नक्षल्यांच्या उपकमांडरला कुरमावडा फाट्याजवळून केली अटक…..-१६ लाखांचे नक्षल्यावर...

मोठी बातमी,गडचिरोली पोलिसांचे मोठे यश…-नक्षल्यांच्या उपकमांडरला कुरमावडा फाट्याजवळून केली अटक…..-१६ लाखांचे नक्षल्यावर होते बक्षीस…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या अनेक चकमकींमध्ये सहभागी राहिलेल्या आणि नक्षल्यांना स्फोटकांसह अन्य साहित्य पुरवठा करणाऱ्या उपकमांडरला पोलिसांनी आज सकाळी जारावंडी-मोहगाव मार्गावरील कुरमावडा फाट्याजवळून अटक केली.चैनुराम उर्फ सुक्कू वत्ते कोरसा (वय ४८) असे अटकेतील नक्षल्याचे नाव आहे.तो छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील टेकामेटा येथील रहिवासी होता.शासनाने त्याच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की,चैनुराम कोरसा हा गडचिरोली जिल्हा आणि छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील जारावंडी आणि पेंढरी या दोन पोलिस ठाण्यांचा घातपात करण्याच्या हेतूने रेकी करीत होता.याबाबत माहिती मिळाल्यानंतर विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्यास कुरमावडा फाट्याजवळ अटक केली. 

चैनुराम कोरसा हा जून २००० मध्ये छत्तीसगडमधील पर्लकोटा दलममध्ये भरती झाला.पुढे २००३ पर्यंत तो एसीएम पदावर होता.त्याचवर्षी त्याला विभागीय समिती सदस्य बनविण्यात आले.२०१४ पर्यंत तो त्याच पदावर नक्षल्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुझमाड डिव्हीजनमध्ये कार्यरत होता.त्यानंतर त्याला पदावनत करुन पुन्हा एसीएम बनविण्यात आले.पुढे नोव्हेंबर २०१६ ला चैनुरामला नक्षल्यांच्या पुरवठा समितीचा विभागीय समिती सदस्य आणि उपकमांडर बनविण्यात आले.मागच्या सहा महिन्यांत चैनुरामने नक्षल्यांना स्फोटके आणि अन्य साहित्याचा पुरवठा केला होता.२०२२ पासून आतापर्यंत पोलिसांनी ७१ नक्षल्यांना अटक केली आहे; अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. पत्रकार परिषदेला अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे व कुमार चिंता उपस्थित होते.चौनुराम कोरसा याने आपल्या कार्यकाळात ७ चकमकींमध्ये सहभाग घेतला.२००९ मध्ये छत्तीसगड राज्यातील पुंगड,बालेवाडा व बाशिंग,२०१० मध्ये गरपा,२०११ मध्ये कोल्हार येथे झालेल्या चकमकी आणि ऍम्बुशमध्ये तो सहभागी होता.२०१० मध्ये चैनुरामने कोंगाल येथील एका इसमाचा खून केला होता.२०२० मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील पोयारकोठी येथील चकमकीतही तो सहभागी होता. या चकमकीत गडचिरोली पोलिस दलातील एक उपनिरीक्षक आणि एक अंमलदार शहीद झाले होते. शिवाय २०२३ मध्ये हिक्केर येथे झालेल्या चकमकीतही त्याने सहभाग घेतला होता.याच चकमकीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे.राज्य शासनाने त्याच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते; अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!