सत्यवान रामटेके(संपादक)
उद्रेक न्युज वृत्त :- आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे.तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक जण आपापल्या परीने काम करीत असतो.ज्याच्या मध्ये जे कलागुण वा कौशल्य आहे; ते जगापुढे वा इतरांपुढे दाखविण्याचा प्रयत्न करून काहींची मने जिंकतो तर काहींचा तिटकाराही सहन करावा लागतो.तंत्रज्ञानाचे युग झाले म्हणून सर्वकाही पैस्यानेच विकत घेतले जाते; असे नाही.एखाद्या दुकानात जाऊन दुकान मालकास म्हणा की,एक किलो तुमची बुध्दी विकत द्या बरं..! तुम्ही जेवढे पैसे म्हणाल तेवढे पैसे देतो; तर दुकान मालक तुम्हाला साखर,तेल,तिखट,मीठा प्रमाणे बुध्दी विकत देणार नाही तर तो तुम्हाला सल्ला देणार की,बुध्दी विकत न घेता ती भाड्याने वा एखादा करार करून मिळू शकेल; याचाच अर्थ असा की,जी मिळालेली देन वा कला,कौशल्य,गुण आहेत; ती इतरांसमोर प्रगट केली जाऊन,भाड्याने वा करार करून म्हणजे उदरनिर्वाहासाठी सर्वांनाच पैश्याची गरज भासते.यासाठी जुळवाजुळव ही करावीच लागते.हे नाकारता येणार नाही.
खाली खेचणारे पंटर प्रगट केल्या जाणाऱ्या कलागुणांना दाबण्याचा प्रयत्न करतांना दिसून येतात.सामोरे जाणाऱ्यांना मागे कसे ओढता येणार; तो आपल्याही पेक्षा वरचढ होत आहे; त्याचे सर्वत्र नाव गाजत आहे; जो-तो त्याचाच गाजावाजा करीत आहेत; मी एवढा अनुभवी,मला सर्वच जमते,मी सर्वांसोबत राहत असून मला कां विचारत नाही म्हणून सामोरे जाणाऱ्याकडे खाली खेचणारे पंटर हे टक लावून पाहत असतात.एखाद्या प्रकरणात सापडतो की काय?त्याची कमकुवत बाजू काय?कुठे जातो; काय करतो,एकदा तरी कोणत्या तरी कचाट्यात सापडला पाहिजे; मग त्याला दाबू! असे अनेक त्रुट्या हे पंटर पाहत असतात.अशांना धंदे नसतात.कुणाचे बरे करणे जर जमत नसेल तर त्याचे वाईटही करू नका.या जगात आपापल्या परीने सर्वजण सामोरे जाण्याचा प्रयत्न करीत असतात.मात्र अनेकांचे मार्ग हे वेगवगळे असतात.सामोरे जाणारा व्यक्ती तो त्याच्या अंगी असलेले कलागुण व कौशल्याने पुरेपूर बुध्दीचा वापर करून पुढे जात आहे नां! तर मग अशाला विरोध वा इतर गोष्टी करण्यात खाली खेचण्याऱ्या पंटर लोकांना कां आवडतात? असा विचार मनात घर करून जातो आहे.
शेवटी एवढेच की,सर्वांनी खाली खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंटरांकडे लक्ष न देता आपण आपले काम करीत राहावे; अशांकडे लक्ष देऊ नये; ‘जलते है जलने दो’ कुत्ते भौकते है,भोंकने दो’.