संपादकीय
संपादक/सत्यवान रामटेके
उद्रेक न्युज वृत्त :-आपण नेहमीच बघत असतो की, काहीजण जनतेच्या भरवशावर आपला बोलबाला करून याची मागणी त्याची मागणी,यावर कारवाई करा,त्यावर कारवाई करा; असे सर्वत्र आढळून व दिसून येत आहे.ज्यांच्या वर जनता विश्वास ठेऊन पाठीशी उभी असते व म्हणते ‘तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ है’ अशांचाच साथ सोडून; त्यांचाच विश्वासघात करून आपलीच पोळी शेकण्याचा अनेकजण प्रयत्न हल्ली करतांना दिसून येतात.त्यामुळेच काही नसते भावा; हा केवळ नुसता तुमच्या-आमच्यासाठी देखावा आहे.असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
अनेक वेळा केवळ समोरा-समोर आगळेवेगळे व चित्र- विचित्र आम्हा-तुम्हांस दाखवून याने हा केला; त्याने तो केला.परंतु नेमका कुणी काय केला; हेच काही कळत नाही.नुसती टीका-टिप्पणी करून ‘चलती का नाम गाडी’ असे केले जाते.जनतेची दिशाभूल करून मोठा गाजावाजा केला जातो.अशातच जनतेच्या भरवशावर ‘सुमडी मध्ये कोंबडी’ खाणारे अनेकजण भेटतात. हल्ली तशी परिस्थितीही निर्माण झाली आहे.नुसता देखावा.म्हणजे जनतेला काही कळत नाही; असे अनेकांना वाटतेय.आगे बढणाऱ्यांपेक्षाही मागे असणारी जनता ही सर्वात हुशार असते.हे विसरून चालणार नाही.जनता-जनार्दनाच्या आवाक्याच्या बाहेर जेव्हा जाणार; तेव्हा हीच जनता आपल्यास धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.