Tuesday, September 1, 2026
Homeकुरखेडासंत सेवालाल महाराजांचे विचार आजही प्रासंगिक- ॲड.उमेश वालदे - कुरखेडाच्या शिवणी येथे...

संत सेवालाल महाराजांचे विचार आजही प्रासंगिक- ॲड.उमेश वालदे – कुरखेडाच्या शिवणी येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-संत सेवालाल महाराज शिक्षित नव्हते.मात्र,विचार करण्याची क्षमता आणि भविष्यातील वेध आत्मसात करण्यात त्यांची दूरदृष्टी होती.पाण्याचे महत्त्व त्यांनी त्या काळातही जाणले होते.भविष्यात पिण्याचे पाणी विकत घेण्याचे वेळ मनुष्यावर येणार आहे,असे भाकीत त्यांनी २५० वर्षांपूर्वीच करून ठेवले होते.त्यांनी भविष्य काळाचे पावले ओळखत विज्ञान व बुद्धीप्रामाण्यवादाचे धडे तसेच अंधश्रद्धेपासून दूर राहत तर्कावर आधारित जिवन जगण्याचा मार्ग आपल्या अनुयायांना दाखविला होता.त्यामुळे संत सेवालाल महाराजांचे विचार हे आजही प्रासंगिक आहेत,असे प्रतिपादन भाजपा अनूसूचीत जाती मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा कुरखेडा नगरपंचायतीचे नगरसेवक ॲड.उमेश वालदे यांनी केले.कुरखेडा तालुक्याच्या गोर बंजारा समाज शिवणी तांडा यांच्या वतीने काल रविवारी
संत सेवालाल महाराजांच्या २८७ व्या जयंती कार्यक्रमाचे शिवणी येथे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना ॲड उमेश वालदे बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन आरमोरी येथील बसस्थानक प्रमुख राजेश राठोड यांचा हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंचा मंजूळा मारगाये,शिक्षक मनोहर गावळ,उपसरपंच कुसन पूराम,हिरामन लंजे,तुकाराम मारगाये,शेषराव मसराम, वेदांत राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
पारंपरिक पूजा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम
यावेळी बंजारा समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच महिला भगीनींनी पारंपरिक पोषाखात व श्रृंगार करीत बंजारा समाजाची ओळख असलेले सांस्कृतिक नृत्य सादर केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंजारा तांडा शिवणीचे नायक विजय मुळे,उपनायक अजय राठोड,नूतन पवार,पतिराम नूंनसावंत,किशोर मुळे, मानसिंग वलते,राजेश राठोड,मोहन पवार,प्रेमलाल पवार,भूपेंद्र मुळे, सूकचरण नूंनसावंत,शिवचरण मूळे,आसाराम मूळे, अमरसिंग राठोड,बोधनसिंग मूळे,लता मूळे,पूष्पा पवार,गंगाबाई पवार,सूनिता राठोड,उर्मिला वलते,भाग्यश्री मूळे,मिराबाई मूळे,विमल मूळे,अनूषा मूळे, जयश्री मूळे,पार्वता मूळे व समाज बांधवांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!