Tuesday, August 25, 2026
Homeब्रम्हपुरीशौचालयाचा खड्डा खोदतांना सापडली श्रीकृष्णाची मूर्ती... - ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमक्ता येथील घटना...

शौचालयाचा खड्डा खोदतांना सापडली श्रीकृष्णाची मूर्ती… – ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमक्ता येथील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रम्हपुरी :- शौचालयाचे बांधकामासाठी खड्डा खोदणे सुरू होते.सात फूट खोल खड्डा खोदून झाल्यानंतर काळा दगड लागला.दगड बाहेर काढल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला.तो केवळ दगड नसून श्रीकृष्णाचे सुरेख शिल्प होते.शिल्प सापडल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केली.मूर्तीला दुग्धभिषेक करत हात जोडले.ब्रह्मपुरी तालुक्यातील येणाऱ्या खेडमक्ता येथील गजानन मानकर यांना ही मूर्ती सापडली आहे.ही मूर्ती बाराव्या शतकातील असून चालुक्य काळातील असल्याचे इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांचे म्हणणे आहे. श्रीकृष्णाचे शिल्प सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.

खेडमक्ता येतील गजानन मानकर यांना खोदकाम करताना ही मूर्ती सापडली.त्यांनी मूर्तीला दुग्धभिषेक घातला. यावेळी प्रमोद मानकर, सचिन मेश्राम, गुरुदेव मानकर मारोती मेश्राम, गिरिधर गुरपुडे, मुकुंदा गुरपुदे, योगेश तुमडे, संदीप गुर्पुडे, केशव मानकर उपस्थित होते.मूर्ती सापडल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.सापडलेले शिल्प दक्षिणात्य शैलीतील आहे.शिल्प काळ्या दगडावर कोरलेले आहे.श्रीकृष्णाच्या डोक्यावर करंडक मुकुट असून हातात बासरी आहे.दोन्ही बाजूला दक्षिणात्य शैलीतील मंदिर कोरलेले आहे.चालुक्यकाळात या भागात श्रीकृष्णाच्या एखादे मंदिर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!