Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीशेतीसाठी तारेची कुंपण योजना; ८५ टक्क्यापर्यंत अनुदान..

शेतीसाठी तारेची कुंपण योजना; ८५ टक्क्यापर्यंत अनुदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राणी आणि मोकाट जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच रब्बी हंगामातील लागवड क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद कृषी विभागाने “शेतीसाठी तारेची जाळी(कुंपण) अनुदान योजना” सुरू केली आहे. ही योजना १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना तारेच्या जाळीच्या खर्चावर तब्बल ८५ टक्क्यांपर्यंत भरघोस अनुदान मिळणार आहे.
योजनेचे तपशील👇
योजनेचे नाव: शेतीसाठी तारेची जाळी योजना
अनुदान दर: ८५ टक्के किंवा ₹७,२३५ प्रति क्विंटल, महत्तम ₹२१,६७५/-(३ क्विंटल मर्यादेत)यापैकी जे कमी असेल ते.
उद्देश: शेतमालाचे वन्य प्राणी,डुक्कर,गाई,म्हशी यांसारख्या जनावरांपासून संरक्षण,तसेच रब्बी हंगामातील पिकाखालील क्षेत्रात वाढ घडविणे.
लाभार्थी: जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी (अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य).
अर्ज प्रक्रिया👇
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे त्वरित अर्ज सादर करावा.अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.अनुदानाच्या अटी, पात्रता,आवश्यक कागदपत्रे आणि सविस्तर माहिती संबंधित पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा जिल्हा परिषद कृषी विभाग कार्यालयात उपलब्ध आहे.शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेताचे आणि पिकांचे प्रभावी संरक्षण करावे,असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!