Monday, July 13, 2026
Homeनागपूरशेतातील विहिरीत पडलेल्या वाघाच्या बछड्याला जीवदान..

शेतातील विहिरीत पडलेल्या वाघाच्या बछड्याला जीवदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील लोहारा शिवारात पांढर तलाव परिसरातील एका शेतातील विहिरीत वाघाचा बछडा पडल्याची वार्ता पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बघ्यांनी मोठी गर्दी केली.लोहारा येथील श्रीकांत धोंगडे यांच्या शेतातील विहिरीत पडलेला वाघाचा बछडा काल बुधवारच्या सायंकाळी एका शेतमजुराच्या निदर्शनास आला.योगेश चालेकर असे या शेतमजुराचे नाव असून तो नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी लोहारा शिवारात गेला होता.त्याला तहान लागल्याने तो विहिरीजवळ गेला. विहिरीतील पाणी काढत असतांनाच वाघाने डरकाळी फोडली.वाघाने डरकाळी फोडताच योगेश घाबरला. विहिरीत डोकावून पाहिले असता वाघाचा बछडा त्याच्या निदर्शनास आला. लागलीच लोहारा परिसरातील विहिरीत वाघ पडल्याची वार्ता पसरताच नागरिकांसह वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली.बराच वेळ होऊनही वाघ बाहेर निघाला नसल्याने रात्री दहा वाजताच्या सुमारास नागपूर येथून रेस्क्यू टीम घटनास्थळी झाली आणि रात्री उशिरापर्यंत विहिरीतून वाघाला काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.शेवटी रात्री उशिरापर्यंत वाघाला बाहेर काढून जीवदान मिळाले.
विहिरीत पडलेला वाघाचा बछडा दीड ते दोन वर्षे वयाचा असल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!