- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील सावकार शांताबाई राधेश्याम अग्रवाल यांच्याकडे शेती कामासाठी स्वतःकडील सोने गहाण ठेवून शेतकऱ्याने पैसे उचलले होते.काही दिवसांनी व्याजासह रक्कम परत करून गहाण ठेवलेले सोने परत मागितले असता सावकाराकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.या प्रकरणी शेतकऱ्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल करून गहाण ठेवलेले सोने परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.भंडारा जिल्ह्यातील विरगाव येथील रहिवासी नरेश सदाशिव गजभिये असे अन्यायग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.विशेष म्हणजे,नियमानुसार कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच सोने तारण कर्ज देता येते.मात्र, कार्यक्षेत्राबाहेरील आदिवासी शेतकऱ्याचे सोने गहाण ठेवण्यात आल्याने परवानाधारक सावकारांची चौकशी करावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शेतकऱ्यांनी सोने गहाण ठेवतांना वजन,रक्कम व व्याजाची पावती देणे आवश्यक आहे.मात्र,अनेक सावकारांकडून पावती न देता साध्या कागदावर व्यवहार करण्यात येत आहेत.नरेश गजभिये हे आदिवासी समाजातील असून अल्पभूधारक शेतकरी आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
- Advertisement -

