Tuesday, July 28, 2026
Homeसंपादकीयशेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीची परंपरा यावर्षी तरी थांबणार काय?

शेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीची परंपरा यावर्षी तरी थांबणार काय?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

संपादकीय

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

उद्रेक न्युज वृत्त :- जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणाऱ्या शेतकरी बांधवांची पिळवणूक करणे केव्हा थांबणार कुणास ठाऊक? जिवाचे रान करून, रात्रंदिवस मेहनत करून,शेती पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवावर सर्वच जण उठले की काय?एकीकडे लागत खर्च जास्त तर उत्पादन कमी; अशी अवस्था असतांनाही कृत्रिमरीत्या येणारे महापूर,हिंस्त्र व जंगली प्राण्यांमुळे पिकांची होणारी नासधूस,कधी अवकाळी पाऊस तर कधी किडीचा प्रादुर्भाव,सततची नापिकी,बँकांच्या कर्जाचे ओझे तसेच इतर कारणांमुळे शेतकरी हवालदिल होऊन; चिंताग्रस्त होऊन आत्महत्या करण्यास धजावित असतात.मात्र याचे कुणाला कसलेही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते.अशातही शेतकरी बांधवांचे धान निघाले की,आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभाव केंद्रावर अभिकर्ता संस्थांकडून धानाची खरेदी केली जाते.येथे अभिकर्ता संस्थांनीच शेतकऱ्यांच्या धानाचा काटा करण्यासाठी मजुरांचा खर्च अदा करणे आवश्यक आहे.परंतु हा खर्च शेतकऱ्यांच्या माथी मारला जातो. यावर कुठलीही कारवाई केली जात नाही.हमालीच्या नावावर शेतकऱ्यांकडून ८ ते १० रुपये प्रतिकट्टा वसुली केली जाते.यावर्षी सुद्धा आर्थिक लुटीची पुनरावृत्ती होणार काय? असा सवाल शेतकरी बांधवांकडून उपस्थित केला जात आहे.हमीभाव खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दरवर्षी हमालीची रक्कम वसूल केली जाते.नाईलाजास्तव शेतकरीसुद्धा मुकाट्याने हमाली देऊन आपले धान विक्री करतात.शेतकऱ्यांच्या असहायतेचा फायदा अभिकर्ता संस्था घेतात.आर्थिक लुटीची ही परंपरा यावर्षी तरी थांबणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.अन्यथा ‘आम भरो पोट भारो अन् प्रत्येक वेळेस शेतकरी मरो’ असे केल्यास उपोषणाचा पावित्रा घेण्यात येणार असल्याचे शेतकरी पुत्रांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!