उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली (कुरखेडा) :- कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा,गुरनोली व चिखली विद्युत फिडर वरील येणाऱ्या गेवर्धा,गुरनोली,देऊळगाव, खेडेगाव,चिखली आंधळी,वडेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपा ला आठ तासाचा विद्युत पूरवठा होत आहे.आठ तासाचा विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाला पाहिजे त्या प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही.शेतीच्या शेवटच्या बांध्या पर्यंत पाण्याचा पुरवठा होत नाही.अशातच शेतकऱ्यांनी उन्हाळी फसल लावलेली आहे.पाणी पुरठ्याअभावी पीक वाळण्याच्या मार्गावर आहेत.कसे बसे शेतकऱ्यांनी कमी जास्त पाण्यानी रोवणी केली आहे.रोवणीच्या वेळेसही पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांचे परे सुद्धा जागेवर वाळून गेले.हल्ली पिकाला पाण्याची फार आवश्यकता आहे.जर शेतीच्या धान पिकाला पाणी मिळाले नाही तर उभे पीक वाळून जाणार असल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या शेती पंपाना चोवीस तास नाही तर कमीत कमी सोळा तास विद्युत पुरवठा करावा; या मागणी साठी शिवसेनेच्या वतीने आज सोमवार १३ मार्च ला शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल,डॉ. महेंद्र कुमार मोहाबंशी उप जिल्हा प्रमुख,तालुका प्रमुख पुंडलिक देशमुख,माजी नगर सेवक,उप तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वात गुरनोली फाट्यावर भव्य चक्का जाम व जेल भरो आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात परिसरातील हजारो शेतकरी उपस्थित झाले. शेतकऱ्यांना १६ तास कृषी पंपाना विद्युत पुरवठा मिळालाच पाहिजे.शेतकऱ्यांच्या एक जुटीचा विजय असो,असा कसा विद्युत १६ तास विद्युत पुरवठा मिळत नाही,घेतल्या शिवाय राहणार नाही.असे नारे देवून परिसर दणाणून सोडले.सुमारे दोन तास चक्का जाम चालू होता.अनेक गाड्या रांगेत उभ्या होत्या.चक्का जाम आंदोलनाला सामोरे जाण्या साठी पोलिस प्रशासनाने विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता मुरकुटे यांना पाचारण केले. प्रसंगी मुरकुटे चर्चे करिता आंदोलकांच्या सामोरे आले असता शेतकऱ्यांनी रोष प्रगट केला.आम्हाला आताच्या आता सोळा तास विद्युत पुवाठा करा अशी मागणी केली.यात उपकार्यकारी अभियंता मुरकुटे यांनी वरिष्ठ अधिकर्यांशी चर्चा करून लवकरच सोळा तास विद्युत पुरवठा करण्या विषयी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी काही वेळ वातावरण तापले होते.
मोर्चेकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.पोलिस विभागाच्या लक्षात आले असता पोलिस अधिकाऱ्यांनी चक्का जाम स्थळामधून शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांच्या सहित शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्याची कार्यवाही सुरू केली. सोबतअविनाश गेडाम उपजिल्हा प्रमुख,महेंद्र मोहबंसी,पुंडलिक देशमुख,विकास प्रधान,गुणवंत कवाडकर,संदीप,पूरशोत्तम तिरगंम,धनिराम झोडे, दशरथ लाडे,नकाराम जांभूळकर यांना ताब्यात घेतले. पोलिस गाड्यामधे अटक करून शेकडो शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनला नेले आणि नंतर सुटका केली. चक्का जाम आंदोलनात विजय पुस्तोडे,राकेश खूने, विभाग प्रमुख गुणवंत कवाडकर देऊळगाव,दशरत लाडे,सेवादास खुने आंधळी,पुरशोत्तम तिरगंम चिखली,धनिराम झोडे खेडेगाव,बोरकर वडेगाव दिगंबर नाकाडे,वासुदेव बहेटवार,प्रभू शिवलवार,अतुल येनुगवर,निकेष हेटकर,जयदेव खूने,श्रीचंद मडावी, रुपराज लाडे,गुरुदेव भोंडे,भाग्यवान लांजेवार,माणिक गायकवाड,परमांद दखने,जगदीश गोबडे,स्वप्नील नागपुरे,नरेश गायकवाड,विलास सुकारे,लुकेश गायकवाड,खेम्राज नाकाडे,अजय गायकवाड,हिरामण बोरकर,होमरज लांजेवार,भास्कर परवते,रतिराम उपतले,विनोद डहाळे,दिलीप लील्हारे,भगवानदास डहाळे,चरण बसोना,किसन बहेट्वर,सुनील कीलनाके, प्रेम लिल्हारे,तुलसीदास दमाहे,नरेश डहाळे,राकेश चव्हान,सत्तर महाजन,सहसिंग भाऊ,नाण्या सोरी,मनु कतलाम व परिसरातील हजारो शेतकरी उपस्थित होते.प्रसंगी पोलिस निरीक्षक संदीप पाटील,पोलिस उपनिरीक्षक दिनेश गावंडे,महिला पोलीस उपनिरीक्षक भावना भिंगारदेवे आणि मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.