Saturday, October 17, 2026
Homeदेसाईगंज'बेस्ट आऊट गोइंग स्टुडन्ट अवॉर्ड २०२३' ने सन्मानित विक्रांत कुथे यांचा चोप...

‘बेस्ट आऊट गोइंग स्टुडन्ट अवॉर्ड २०२३’ ने सन्मानित विक्रांत कुथे यांचा चोप ग्रामपंचयतीच्या वतीने  सत्कार   

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त                  

देसाईगंज:- तालुक्यातील चोप येथील विक्रांत भाऊराव कुथे यांना एम.आय.टी.वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे मधील ‘बेस्ट आऊट गोइंग स्टुडन्ट अवॉर्ड २०२३’ सन्मानित करण्यात आले आहे. एम.आय.टी.वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे येथील विवेकानंद आडीटोरीयम येथे पार पडलेल्या ३ दिवसीय उमंग सोशीयल गॅदरिन्ग २०२३ दरम्यान  विक्रांतला मराठी सिनेसृष्टीतील सिनेमॅटोग्राफर महेश लिमये (चीफ गेस्ट) यांच्या हस्ते  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विक्रांतने ऑगस्ट २०२० मध्ये एम.आय.टी.पुणेला स्पेसिऍलिसशन इन गव्हर्नमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन ह्या तीन वर्षीय डिग्री कोर्स साठी ऍडमिशन घेतली होती.

‘बेस्ट आऊट गोइंग स्टुडन्ट अवॉर्ड २०२३’ ने सन्मानित विक्रांत कुथे यांनी पुणे याठिकाणी देसाईगंज तालुक्यातील चोप गावाचे नाव उज्वल केल्याने आज १३ मार्च २०२३ रोजी चोप ग्रामपंचायतीच्या ग्रामसभागृहात विक्रांत कुथे यांचा शाल व श्रीफळ देऊन  सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन लाडे,माजी सरपंच आत्माराम सूर्यवंशी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा संघटक राधेश्याम बरिय्या,ग्रामपंचायत उपसरपंच प्रकाश डोंगरवार,ग्रामपंचायत सदस्य मनीषा उईके, निर्मला उपरीकर,भाऊराव उइके, रुपराम लांजेवार,हरी कुथे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!