Saturday, September 5, 2026
Homeदेसाईगंजशिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.यावेळी नगर परिषद शाळांतील शिक्षकांचा सन्मान,महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच आदर्श शाळेचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये नगर परिषद शाळांमधील तब्बल १४ विद्यार्थी पात्र ठरले.ही देसाईगंज नगर परिषदेसाठी निश्चितच अभिमानाची व भूषणावह बाब असल्याचे केंद्रप्रमुख अमनार यांनी प्रास्ताविकेतून स्पष्ट केले.नगर परिषद शाळांची पटसंख्या तसेच शैक्षणिक गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत असून, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन,विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य यामुळे हा सकारात्मक बदल घडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेच्या अध्यक्षा  लता सुंदरकर होत्या.यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष  नरेशजी विठलानी,शिक्षण सभापती बाळकृष्ण माडूलवार,आरोग्य सभापती चैतनदास विधाते,महिला व बालकल्याण सभापती भाविआ साधवानी तसेच नगर परिषद सदस्य विलास लोखंडे,राहुल सतवानी,लता, भारती कुथे,पार्वता बेदरे,पल्लवी मेंढे,आशा दहिवले व राधिका पत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नगर परिषद अंतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थी सक्षम गजानन कवासे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी,शिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित अभ्यास आणि पालकांचे सहकार्य याविषयी त्यांनी आत्मविश्वासाने आपले विचार मांडले.
सक्षम कवासे यांच्या प्रभावी व आत्मविश्वासपूर्ण भाषणाचे नगर परिषद उपाध्यक्ष नरेश विठलानी यांनी विशेष कौतुक केले.विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे,तर आत्मविश्वासाने विचार मांडण्यातही पुढे यावे आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
  • महात्मा गांधी शाळेला आदर्श शाळेचा सन्मान👇

कार्यक्रमात महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड यांना आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विविध उपक्रम,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची यावेळी दखल घेण्यात आली.

तसेच सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,कस्तुरबा वॉर्ड येथील धर्मेंद्र उईके आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक नगर परिषद शाळा, पटेल वॉर्ड येथील मीनाक्षी शालिग्राम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान,शिक्षण सभापती बाळकृष्ण माडूलवार यांनी आपल्या मनोगतातून नगर परिषद शाळांतील शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले.नगर परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेत होत असलेली सातत्यपूर्ण प्रगती ही समाधानाची बाब असल्याचे सांगत त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.
“विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य या तिन्ही घटकांची महत्त्वाची भूमिका असते,” असे त्यांनी नमूद केले.शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे शिल्पकार आहेत.त्यांच्या कार्याचा सन्मान आणि विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव हा इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा देणारा ठरतो,असे उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
  • गुणवत्तावाढीचा नवा अध्याय👇
नगर परिषद शाळांची वाढती पटसंख्या,शिष्यवृत्ती परीक्षेतील वाढते यश,गुणवंत विद्यार्थ्यांची कामगिरी आणि विविध शैक्षणिक उपक्रम यामुळे देसाईगंज नगर परिषद शाळा गुणवत्तावाढीच्या दिशेने भक्कम वाटचाल करत असल्याचे या सोहळ्यातून अधोरेखित झाले. शिक्षकांचा सन्मान,तब्बल १४ गुणवंत शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि आदर्श शाळेचा गौरव असा त्रिवेणी संगम साधणारा हा सोहळा उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला.गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून नगर परिषद शाळांचा नावलौकिक अधिक उंचावण्याचा निर्धार या सोहळ्याने अधोरेखित केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!