उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र शासनाने दिनांक ७ जुलै २०२३ रोजी परीपत्रक काढून ७० वर्षापर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्वावर शिक्षक म्हणून नियुक्ती द्यावी; असे निर्देश प्रशासनाला दिलेले आहे.या निर्णयाला सरपंच संघटना जिल्हा गडचिरोली, निवेदनाद्वारे सदर परीपत्रकाचा निषेध करीत आहे.शासनाच्या चूकीच्या धोरणामूळे व बेजबाबदार निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये नोकर भरतीच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत.नोकरभरती होत नसल्यामुळे बेरोजगारी खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे.आई-वडील,परीवार मुलांना शिक्षण देण्यासाठी आज लाखो रुपये शिक्षणासाठी खर्च करीत आहेत. परंतु एवढे महागडे शिक्षण घेऊनही मुलांना नोकऱ्या,रोजगाऱ्यांच्या संधी शासन उपलब्ध करून देत नसल्यामुळे परीवार व युवकांच्या मनामध्ये शासनाविरुध्द कलूशीत भावना निर्माण होत आहे. शासनाचे सर्व षडयंत्र कळून चुकल्यामूळे शासनाच्या ध्येय धोरणांविरुध्द जनता कधी रस्त्यावर उतरेल ते सांगता येत नाही.म्हणून जनतेला त्रास होईल असे चुकीचे धोरण शासनाने न राबविता खऱ्या अर्थाने व न्यायाच्या भूमिकेने जिल्ह्यातील डी.एड.बी.एड व सुशिक्षित बेरोजगार युवकांना शिक्षक म्हणून नियुक्ती द्यावी; अनेक बेरोजगार पदवीधर शिक्षक होण्याचे दिवास्वप्न बघत आहेत.मात्र त्यांना बाजूला सारून, निवृत्त शिक्षकांना मानधनाचे प्रलोभन दाखवून; पुन्हा सेवेत संधी देणे हे बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे.त्यामुळे शासनाने देशात राज्यात वाढत असलेल्या सुशिक्षित पदवीधर बेरोजगारांचा विचार करुन सदर परीपत्रक रद्द करण्यात यावे; अन्यथा सरपंच संघटना जिल्हा गडचिरोली, सुशिक्षित बेरोजगार व जनतेला घेऊन युवकांच्या भविष्यासाठी आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही; असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन सादर करतेवेळी अपर्णा नितीन राऊत सरपंच संघटना अध्यक्ष,संदीप वरखडे उपाध्यक्ष,पुरुषोत्तम बोवणे सचिव,चक्रधर नाकाडे जिल्हासंघटक,चेतन सुरपाम तालुका सचिव,रंजीता पेंदाम सरपंच मौशीखांब,महानंदा आतला सरपंच कारवाफा, कांता हलामी सरपंच राजोली,निरुता राऊत सरपंच पोर्ला, भाग्यश्री गायकवाड सरपंच बोडधा,वनमाला पुस्तोडे, सरपंच डोंगरगांव,माधुरी भुरसे सदस्या मौशीखांब, राजेंद्र गायकवाड उपसरपंच बोडधा,राजू नाकाडे सदस्य बोडधा व इतर मान्यवर उपस्थित होते.