Wednesday, June 17, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्यकार्यकारी अधिकारी आयुषी सिंग.....- मान्यवरांच्या हस्ते स्वागत....

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्यकार्यकारी अधिकारी आयुषी सिंग…..- मान्यवरांच्या हस्ते स्वागत….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्हा परिषद गडचिरोलीचे कुमार आशीर्वाद यांच्या बदली नंतर काल २६ जुलै २०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास पालघर जिल्ह्यातून आलेल्या आयुषी सिंग यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचा(सिओ)पदभार स्वीकारला.

आयुषी सिंग या पालघर येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. काल पदभार स्वीकारताच त्यांचे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून तसेच सेवानिवृत्त दिव्यांग कर्मचारी व दिव्यांगांसाठी आणि त्यांचे न्याय हक्कासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते मुकुंदराव उंदिरवाडे यांचे नियोजनातून नव्याने रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे भव्य स्वागत करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे महिला कर्मचाऱ्यांकडून तिलक लावून स्वागत करण्यात आले.त्यानंतर राजेंद्र भुयार,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,शेखर शेलार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन,रवींद्र कणसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत,शिर्के प्रकल्य संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा फरेंद्र कुतिरकर,प्रकल्प संचालक जलजीवन मिशन व इतर खाते प्रमुख यांनी पुष्प गुच्छ देऊन आयुषी सिंग यांचे स्वागत केले. जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश केल्यानंतर सिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराज,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तदनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात जिल्हा परिषदेच्या खाते प्रमुखांचे परिचय घेतले.जिल्हा परिषद गडचिरोलीला प्रदीर्घ कालावधीनंतर महिला मुख्य कार्यकारी अधिकारी लाभल्याने तसेच त्यांचे पूर्वीचे कार्यकाल व त्यांच्या कार्यशैलीबद्दल विचार केला असता त्या उत्तम प्रशासक असल्याचे सिद्ध होते.असे उत्तम प्रशासकीय अधिकारी गडचिरोली जिल्ह्याला  लाभल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार विभागाचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १८ जून...

डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे चार हजार रुपये द्यायला सांगताच एसीबीची धाड; दोघेजण अडकले जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी गेलेल्या तक्रारदारास दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन मालमत्तांच्या रजीस्ट्रीचे चार हजार रुपये लागतील,असे सांगून ते पैसे डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे...

अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला येणार पीएम किसानचे दोन हजार खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(PM-KISAN)योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दिला जाणारा २३ वा हप्ता हा येत्या,शनिवार २० जून २०२६ रोजी वितरित...

आता एमआरपीपेक्षा अधिक दराने खते विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासह परवाना रद्द करण्याची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे,खते व कीटकनाशके वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध व्हावीत,तसेच बोगस बियाणे विक्री,साठेबाजी आणि जादा दराने खतविक्रीच्या प्रकारांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!