- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे,तर काहींनी प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.याचदरम्यान,महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर म्हणजे मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे.
राज्यातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता
यावा; यासाठी शासनाने सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय
घेतला आहे.राज्यातील विविध मतदारसंघातील व्यवसाय,व्यापार,औद्योगिक उपक्रम आणि इतर कोणत्याही आस्थापनेत कार्यरत असणाऱ्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार आहे.यानुसार उद्योग विभागात येणाऱ्या उद्योग समूह,महामंडळे,कंपन्या आणि संस्था किंवा इतर आस्थापनांना हे शासन परिपत्रक लागू राहील.या दिवशी सुट्टी मंजूर झाल्याने वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.
- Advertisement -

