उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड(खुर्द), किसाननगर येथे १२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी २ वाजता फुले-आंबेडकर जयंती दिनाचे औचित्य साधून तथागत गौतम बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे.
११ एप्रिल रोजी भन्ते भागीरथ कोठरी यांच्या हस्ते बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना होणार असुन १२ एप्रिल ला बुद्ध मुर्तीचा अनावरण सोहळा माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांचे अध्यक्षतेखाली तर माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते अनावरण सोहळा पार पडणार आहे.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी,माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड.राम मेश्राम,रिपाईचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे,गगण मलीक फाऊंडेशनचे नितिन गजभिये,प्रकाश कुंभे,स्वाती वाकडे नागपूर, पिरिपाचे गडचिरोली जिल्ह्यध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर, शेट्युल कास्ट फेडरेशनचे राष्टीय अध्यक्ष ॲड.विनय बांबोळे,पिरिपा नेते मुर्लीधर भानारकर,प्राचार्य हेमंत रामटेके तसेच विशेष अतिथी म्हणुन सिद्धार्थ सुमन, मनोहर गेडाम,मारोती भैसारे,ॲड.सि.एम.जनबंधु, सोनु साखरे,संतोष रावत,संदिप गड्डमवार,भावना बिके उपसरपंच व्याहाड,कांबळे कार्याध्यक्ष रिपाई,मोरेश्वर चंदनखेडे महासचिव रिपाई,प्रमोद सरदारे,प्रमोद खोब्रागडे,दिलीप पाटिल,शिध्दार्य नंदेश्वर,अर्पना खेवले, अर्चना नाईक,वनिता बांबोळे,परशुराम बांबोळे,रोशन उके,किशोर उंदिरवाडे,मुक्तेश्वर नगराळे आदींची उपस्थिती लाभणार आहे.तरी हजारोच्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन बौद्ध समाज मंडळ किसाननगर,व्याहाड (खुर्द ) यांनी केले आहे.