उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यातील शहरीव ग्रामीण भागात एक अनोखा प्रकार हल्ली पहावयास मिळत असून शासकीय रुग्णालयांतील डॉक्टर,अधिकारी,कर्मचारी शासकीय वेतन घेऊन खासगी रुग्णालये व इतर दुकाने थाटून दुकानदारी करीत असल्याची बाब निदर्शनास येऊ लागली असल्याने; अशा दुकानदारी थाटनाऱ्यांवर कारवाई कधी होणार? असे सर्वसामान्य जनतेकडून सुर निघू लागले आहेत.
नागरिकांना चांगली व उत्कृष्ट परिपूर्णरित्या आरोग्याची सेवा मिळावी म्हणून शासन स्तरावरून विविध योजना,अभियान राबवीत आहेत.लाखो रुपये वेतन देऊन शासकीय रुग्णालयांत डॉक्टरांची,अधिकारी,कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येते.मात्र,असे असतांनाही शासकीय वेतन घेऊन खासगी रुग्णालये व इतर पेशातील शासकीय डॉक्टर,अधिकारी,कर्मचारी गोरगरीब जनतेला व शासनाच्या तिजोरीला चुना लावण्याचे काम खासगी व्यवसाय थाटून करीत आहेत.
काही शासकीय डॉक्टर निवृत्त होऊनही ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसतांना रुग्णांच्या घरी जाऊन उपचार करण्याचा गोरखधंदा शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात चालवला आहे. एखादा रुग्ण गंभीर झाल्यास;अशा रुग्णांना थेट दुसरीकडे(रेफर) जाण्याचा सल्ला देऊन; अंगलट येणारे प्रकरण दाबल्या जात आहे.जिल्ह्यातील शासकीय डॉक्टर व शासकीय रुग्णालयातील अधिकारी,कर्मचारी खासगी संसार थाटून आपला बोलबाला करून पैस्याच्या हव्यासापोठी सर्वसामान्य जनता व गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याशी खेळत असल्याने; अशा झोलाछाप शासकीय डॉक्टर व शासकीय रुग्णालयांतील खाजगी संसार थाटनाऱ्यांवर कारवाई कधी केली जाणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.