Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली गोंडवाना विद्यापीठात राज्य मागासवर्ग आयोगाची आढावा बैठक संपन्न- २०८८ शिक्षकांची पदे...

गडचिरोली गोंडवाना विद्यापीठात राज्य मागासवर्ग आयोगाची आढावा बैठक संपन्न- २०८८ शिक्षकांची पदे तातडीने भरली जावीत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राज्य मागासवर्ग आयोगाने गोंडवाना  विद्यापीठाला काल १७ फेब्रुवारी २०२३ ला भेट देऊन विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक पदभरतीचा आढावा घेतला.गडचिरोली गोंडवाना विद्यापीठ सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर बैठकीत शासनाने २०८८ शिक्षकांची पदे महाराष्ट्रातील विद्यापीठे व  महाविद्यालयांना मंजूर केली आहेत.ही पदे तातडीने भरली जावीत; यासाठी आयोगाकडून आढावा घेतला जात आहे.शासन निर्णयानुसार संवर्गनिहाय आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी; तसेच त्याचा लाभ सर्व संवर्गाला व्हावा.असे मत समितीतील सदस्यांनी बैठकीत व्यक्त केले. संवर्गनिहाय आरक्षण धोरणाचा पाठपुरावा होणे हा बैठकीचा उद्देश आहे.महाराष्ट्रातील पदभरतीचा अनुशेष भरण्यात यावा.

नॅकच्या दृष्टिकोनातून संस्थांचे मूल्यांकन वाढावे आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे.यासाठी हा आढावा महत्त्वपूर्ण असल्याचे समिती सदस्यांनी सांगितले.विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी तातडीने सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे भरली नाहीत तर  इतर महाविद्यालयांना ही पदे मंजूर करण्यात येईल.असेही सांगितले. 

विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या स्कॉलरशिप चा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे; ज्या महाविद्यालयांमध्ये इक्वल अपॉर्च्युनिटी कक्ष नाही;अशा महाविद्यालयांमध्ये स्थापन करण्यात यावा.असेही निर्देश समितीतील सदस्यांनी दिले.यावेळी विद्यापीठात सुरू असलेल्या अनेक उपक्रमां बाबत संशोधन केंद्राचे संचालक डॉ.मनीष उत्तरवार यांनी पीपीटी द्वारे सादरीकरण केले.गेल्या अकरा वर्षात विद्यापीठाची सुरू असलेली यशस्वी घोडदौड पाहता; ती इतर विद्यापीठांच्या तुलनेत अतिशय चांगली असल्याचे समितीतील सदस्यांनी मत व्यक्त केले.तसेच नव संशोधन केंद्राचे संचालक डॉ.मनीष उत्तरवार यांचा समितीतील सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्यासाठी सत्कार केला. 

बैठकी दरम्यान महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग माजी न्यायमुर्ती चंद्रलाल मेश्राम(सदस्य), प्रा.डॉ.नीलिमा सरप,प्रा.डॉ.गोविंद काळे,गोंडवाना विद्यापीठाचे  प्र.कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे,कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन,अधिष्ठाता मानव विज्ञानशाखा डॉ.चंद्रमौली, नवसंशोधन केन्द्राचे संचालक डॉ.मनिष उत्तरवार,सहाय्यकआयुक्त मुंबई मेघराज भाटे,नागपूर विभाग सहसंचालक उच्च शिक्षण डॉ.संजय ठाकरे,समाज कल्याण आयुक्तगडचिरोली अमोल यावलीकर,  सहाय्यक आयुक्त मनोहर पोटे आदी उपस्थित होते.बैठकीत आभार कुलसचिव डॉ.अनिल हीरेखन यांनी मानले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!