Monday, August 17, 2026
Homeकुरखेडावीटभट्टी व अवैध रेती उपसा प्रकरणी दोषींवर होणार कारवाई- अखेर लिखित स्वरूपात...

वीटभट्टी व अवैध रेती उपसा प्रकरणी दोषींवर होणार कारवाई- अखेर लिखित स्वरूपात दिलेल्या पत्रातून उपोषण मागे- कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला येथील प्रकरण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली (कुरखेडा) :- कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या शासनाच्या गौण खनिजांची चोरी केली जात असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.मात्र याकडे कुरखेडा महसूल प्रशासन कानाडोळा करून तक्रार करणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला जात नसल्याने कुंभिटोला येथील नागरिकांनी उपोषणाचे हत्यार उपसले.उपोषणाचे हत्यार उपसताच कुरखेडा महसूल प्रशासन खळबळून जागे होऊन लिखित स्वरूपात दिलेल्या पत्रातून संबंधितांवर दोन दिवसात कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कुंभिटोला येथील वीटभट्टी तसेच अवैधरित्या रेती उपसा प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याकरिता १३ मार्च पासून तहसील कार्यलयासमोर उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांच्या लढ्याला तब्बल सात दिवसांनी यश आले असून उपविभागीय अधिकारी,तसेच तहसीलदार यांच्या लिखित स्वरूपात दिलेल्या पत्रातून उपोषण मागे घेण्यात आले आहे. 

सदर प्रकरणात दोषी असलेल्या संबंधितांवर तात्काळ येत्या दोन दिवसात कारवाई केली जाणार असे सुद्धा त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.हा सत्याचा विजय असून संबंधित प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार असल्याचे लिखित पत्र असल्याने आम्ही उपोषण मागे घेत असल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे.कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला येथील वीटभट्टी प्रकरण तसेच अवैध रेती उपसा प्रकरणी गावकऱ्यांचा विरोध होता.याबाबत गावकऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही केली होती मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.तहसील कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे ठोठावूनही काहीही फरक न पडल्याने अखेर उपोषणाचे दरवाजे उघडत तहसील कार्यालय कुरखेडा समोर सोमवार १३ मार्च पासून चेतन गहाणे व राजू मडावी उपोषणाला बसले होते.या दरम्यान अधिकारी वर्गाकडून उपोषण मागे घेण्याची विनवणीही करण्यात आली.मात्र उपोषणकर्त्यांनी मागे न हटता उपोषण सुरू ठेवले व जोपर्यंत कारवाई होणार नाही अथवा लिखित स्वरूपात कारवाई करण्याची हमी देत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे ठाम मत केले होते.दरम्यान उपोषणाच्या सात दिवसाच्या कालावधीत चेतन गहाणे यांना धमक्याही आल्यात,महिला तलाठीमार्फतही धमकी आली.मात्र त्यांना न जुमानता उपोषण सुरू ठेवले यावेळी उपोषणकर्ते राजू मडावी यांची प्रकृती खालावली त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले व पुन्हा उपोषणस्थळी दाखल झाले. उपोषणाच्या सात दिवसाच्या कालावधीत अनेकांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला,तर आज १९ मार्च रोजी आमदार कृष्णा गजबे यांनी सुद्धा भेट दिली.तसेच कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी सुद्धा उपोषणस्थळी भेट देऊन सदर प्रकरणातील दोषींवर उचित कारवाई करण्यात येईल असे लिखित स्वरूपात पत्र देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले असता उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

आता या प्रकरणी काय कारवाई होते याकडे तालुकासह जिल्हावासीयांचे लक्ष लागले असून या प्रकरणात अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चेतन गहाणे उपोषणकर्ते 👇

हा सत्याचा विजय असून संबंधित प्रकरणात दोषींवर कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणास बसू, अधिकाऱ्यांनी उचित कारवाई करून न्याय द्यावा; त्यामुळे पुढे कोणीही असल्याप्रकारे कार्य करणार नाहीत.

राजू मडावी उपोषणकर्ते 👇

तब्बल सात दिवसानंतर संबंधित अधिकारी यांनी आम्हाला लिखित स्वरूपात कारवाई करण्याची हमी दिल्याने हे उपोषण मागे घेत आहोत,मात्र कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणाला बसू.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!