उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील १६ वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेतून घरी परत येत असतांना वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना आज १८ मार्च २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली आहे.
मृत्यू झालेल्या मुलीचे नाव- कुमारी स्विटी बंडु सोमनकर चामोर्शी तालुक्यातील तलाठी साजा क्रमांक-१ नवेगाव रै मधील मौजा- मालेरचक,मंडळ कुनघाडा येथील रहिवाशी असून सदर मुलगी इयत्ता ९ वी ची विद्यार्थिनी होती. स्विटी ही शाळेतून परत येत असतांना वीज कोसडून गंभीर जखमी झाली होती.जखमी अवस्थेत तिला उपचाराकरिता सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आले असता मृत पावली आहे.